News Flash

अंतर्वस्त्रांबाबत उघडपणे बोलली प्रियांका

प्रियांकाला आजही अंतर्वस्त्रांमध्ये एखाद्या दृश्याचे चित्रिकरण करताना संकोचल्यासारखे वाटते

'न्युयॉर्क फॅशन वीक'मध्ये प्रियांकाला अंर्तवस्त्रांशी निगडीत काही प्रश्न विचारण्यात आले होते

बॉलिवूडमध्ये नामांकित आणि यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नावही अग्रस्थानी आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसह आता प्रियांका हॉलिवूडमधील इंग्रजी सिरीजमुळेही प्रचंड चर्चेत आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत प्रियांकाने अनेक भूमिका साकारल्या आहेत. तिच्या काही भूमिकांना तर रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. ‘मिस वर्ल्ड’ हा किताब आपल्या नावावर केलेल्या या अभिनेत्रीने अंतर्वस्त्रांविषयीचे तिचे मत व्यक्त केले आहे.
विविध सौंदर्यस्पर्धांमध्ये स्पर्धक मॉडेल्सना बऱ्याचदा अंतर्वस्त्रांमध्ये रॅम्पवर चालावे लागते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रियांकालाही असे करावे लागले होते. पण यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या प्रियांकाला आजही अंतर्वस्त्रांमध्ये एखाद्या दृश्याचे चित्रिकरण करताना संकोचल्यासारखे वाटते असे खुद्द प्रियांका म्हणाल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे. नुकत्याच झालेल्या ‘न्युयॉर्क फॅशन वीक’मध्ये प्रियांकाला अंतर्वस्त्रांशी निगडीत काही प्रश्न विचारण्यात आले होते, त्यावेळी तिने आपले मत मांडले होते.

वाचा: ‘कॉम्प्लिकेटेड रिलेशनशीप’मध्ये असल्याची प्रियांकाची कबुली

सध्या प्रियांका तिच्या ‘क्वांटिको’ या सिरिजच्या पुढच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्ये ‘काशीबाई’ची भूमिका साकारल्यानंतर प्रियांका बॉलिवूडपासून काहीशी दुरावली आहे. ‘क्वांटिको’च्या पहिल्या सिझननंतर ‘क्वांटिको २’ मध्येही ती अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारणार आहे. या सिजनमध्ये प्रियांका चोप्रा आणि जॅक मॅकलाफलिन यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहावयास मिळू शकते. याव्यतिरीक्त यात जोहाना ब्रॅडी आणि यास्मिन अल मास्री यांच्याही भूमिका आहेत. ‘क्वाटिंको २’ शिवाय प्रियांका ‘बेवॉच’ या चित्रपटातही एका भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती हॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. अलेक्झांड्रा दद्दारिओ, इलफेनेश हॅडेरा आणि केली या अभिनेत्री तसेच ड्वेन जॉन्सन (रॉक), झॅक एफरॉन, जॉन बॅस हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत.

वाचा: ‘रुपेरी पडद्यावरील ‘आशा’ प्रियांकाने साकारावी’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 1:33 pm

Web Title: priyanka chopra opens up about her undergarments
Next Stories
1 केतकीची अमेरिकावारी
2 …आणि सनीने ग्लिसरिन वापरण्यास दिला नकार
3 हजरत चिश्तींच्या दर्ग्यात चेहरा झाकून पोहोचली कतरिना..
Just Now!
X