30 May 2020

News Flash

बाप रे… रंगेहाथ पकडलंत; प्रियांका चोप्राचं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर

या कृत्यासाठी कलम ३९३ नुसार दंड आणि ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो असे महाराष्ट्र पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले आहे

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियाकां चोप्रा सतत चर्चेत असते. कधी तिने निकसोबत शेअर केलेल्या फोटोंची चर्चा असते तर कधी तिच्या चित्रपटांची. सध्या चर्चा सुरु आहे ती प्रियांकाच्या आगामी चित्रपटाची ‘द स्काय इज पिंक.’ शोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपट प्रियांकासोबत अभिनेता फरहान अख्तर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी या चित्रपटासंदर्भात प्रियांकाला ट्विट करत तिची फिरकी घेतली आहे.

घाबरु नका हे ट्विट प्रियांकाच्या कोणत्या अपराधासाठी नाही तर तिच्या चित्रपटातील एका डायलॉगसाठी करण्यात आले आहे. ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रियांका फरहानला ‘एकदा आयशा ठिक होऊ दे मग आपण दोघे मिळून बॅंक लुटूया’ असे सांगताना दिसत आहे. या सीनचा स्क्रीनशॉट शेअर करत महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट केले आहे. त्यांनी ‘या कृत्यासाठी तुम्हाला कलम ३९३ नुसार दंड आणि ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो’ असे ट्विटमध्ये लिहिले.

महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्विटवर प्रियांकाने मजेशीर उत्तर दिले आहे. ‘उप्स! आम्ही रंगे हाथ पकडलो गेलो. आता प्लॅन बी अॅक्टीव्हेट करण्याची वेळ आली आहे’ असे प्रियांकाने महाराष्ट्र पोलिसांना उत्तर दिले आहे. दरम्यान अभिनेता फरहान अख्तरने देखील महाराष्ट्र पोलिसांना उत्तर दिले आहे. त्याने ‘पुन्हा कॅमेरासमोर चोरी करण्याची योजना करणार नाही’ असे लिहिले आहे.

शोनाली बोस दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियांका या चित्रपटातून तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतत आहे. २०१६ मध्ये तिचा ‘जय गंगाजल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, झायरा वसीम, फरहान अख्तर, रोहित सराफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘द स्काय इज पिंक’ ही एका कुटुंबाची भावनिक कथा आहे. ज्यामध्ये प्रियांका-फरहानची प्रेमकहाणी आणि त्यानंतर त्यांच्या मुलीला होणारा दुर्मिळ आजार याबद्दल दाखवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2019 6:14 pm

Web Title: priyanka chopra planning for for bank robbery but mumbai police caught her avb 95
Next Stories
1 केबीसीला मिळाला पहिला करोडपती
2 आमिरचे मोगुलमधील पुनरागमन धक्कादायक – गितीका त्यागी
3 सुबोध भावे आणि भरत जाधव पुन्हा एकत्र, करणार हा चित्रपट
Just Now!
X