News Flash

..म्हणून प्रियांका करतेय सलमानची मनधरणी

निक जोनासबरोबर लग्न करणार असल्यामुळे तिने 'भारत' चित्रपटमध्येच सोडल्याचं सांगण्यात येत आहे.

‘क्वांटिको’ मालिकेमुळे ‘ग्लोबल स्टार’ ठरलेली प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. प्रियांका सध्या तिच्या ‘दी स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात परतली आहे. यापूर्वी प्रियांका सलमान खानच्या भारत चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र तिने अचानक ‘भारत’ला रामराम ठोकला. तिच्या अशा वागण्यामुळे सलमान थोडा नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे  सलमानची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रियांकाकडून करण्यात येत असल्याचं दिसून येतं.

प्रियकर निक जोनासबरोबर लग्न करणार असल्यामुळे प्रियांकाने ‘भारत’ मध्येच सोडल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र प्रियांकाने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र प्रियांकाच्या अशा वागण्यामुळे सलमान कुठेतरी दुखावला गेल्याची जाणीव झाल्यानंतर तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

हॉलिवूड चित्रपटासाठी प्रियांकाने ‘भारत’ सोडल्याचं काही दिवसापूर्वी सलमानने सांगितलं होतं. सलमानच्या या वक्तव्यानंतर प्रियांकाने सलमानची नाराजी ओळखत ती दूर करण्यासाठी नवी शक्कल लढविल्याचं पाहायला मिळतंय. प्रियांकाने सलमानच्या आगामी चित्रपटांची स्तुती करताना दिसत आहे.

सलमान ‘लवरात्री’ या चित्रपटामधून मेहुणा आयुष शर्माला लॉन्च करत आहे. हेच निमित्त साधत प्रियांकाने या चित्रपटाचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मित्रा आयुष चित्रपटसृष्टीमध्ये तुझं स्वागत आहे. चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिला आणि मला विश्वास आहे तू नक्कीच एक चांगला अभिनेता होशील’, असा मेसेज प्रियांकाने दिला आहे.

दरम्यान, सलमान आणि प्रियांका बऱ्याच काळानंतर ‘भारत’ चित्रपटामध्ये एकत्र झळकणार होते. मात्र प्रियांकाने ऐनवेळी हा प्रोजेक्ट सोडला. विशेष म्हणजे प्रियांकाने चित्रपटासाठी नकार दिल्याचं अली अब्बास जफर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 10:13 am

Web Title: priyanka chopra praises salman khan aayush sharma
Next Stories
1 फरहानसोबतच्या नात्याविषयी शिबानीने अखेर सोडलं मौन
2 VIDEO: कियाराचं नाव घेताच सिद्धार्थ म्हणाला…
3 VIDEO : अन् चाहतीच्या मदतीस धावला रणवीर
Just Now!
X