News Flash

परदेशात प्रियांकाने सुरु केले भारतीय रेस्टॉरंट

भारतातील जेवणाची चव आता एन.वाय.सी मध्ये...

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांका सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आता प्रियांकाने तिच्या एका मित्राला न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू करण्यास मदत केली आहे. त्याचे काही फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर करत त्यामागची सगळी कहानी सांगितली आहेत.

प्रियांकाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. एका फोटोत सोना म्हणजेच तिच्या रेस्टॉरंटचे नाव, दुसऱ्या फोटोत प्रियांका आणि तिचा मित्र मनीष, तर तिसऱ्या फोटोत प्रियांका पती निकसोबत दिसत आहे. “तुमच्या सगळ्यांसमोर सोना, एन.वाय.सी मधील एक नवीन रेस्टॉरंट यात मी भारतीय जेवणावरचे माझे प्रेम ओतले आहे. सोना हे भारताचे आणि ज्या चवीसोबत मी वाढली त्याचे एक स्वरूप आहे. उत्तम शेफ, हरीनायक याने या रेस्टॉरंटचा मेनु ठरवला आहे, तुम्हाला सगळ्यांना माझ्या देशातल्या सगळ्या प्रकारच्या जेवणाची चव इथे मिळेल,”असं प्रियांका म्हणाली.

पुढे ती म्हणाली, “सोना या महिन्याच्या शेवटी उघडणार आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना तिथे भेटण्याची मी प्रतिक्षा करू शकत नाही! माझे मित्र मनीष गोयल आणि डेव्हिड रॉबिन त्यांच्या नेतृत्त्वाशिवाय हे करणे शक्य झाले नसते. डिझायनर मेलिसा बॉवर्स आणि तिच्या टीमशिवाय हे एवढे चांगले दिसले नसते त्यासाठी त्यांचे आभार.”

पुढे ती म्हणाली, “दुसरा आणि तिसरा फोटो हा सोनाला देवाचा आर्शिवाद मिळाला पाहिजे म्हणून सप्टेंबर २०१९मध्ये एक छोटी पुजा करतानाचा आहे.”

दरम्यान, ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकात प्रियांकाने तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. प्रियांकाने ‘द टेक्ट फॉर यू’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 10:18 am

Web Title: priyanka chopra presents new restaurant sona in new york says she poured her love for indian food into this dcp 98
Next Stories
1 नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे कालवश
2 स्त्रीत्व जपताना..
3 सरधोपट वाट
Just Now!
X