News Flash

प्रियांकाच्या ‘या’ हॅण्डपर्सची किंमत माहितीये का ?

जाणून घ्या किंमत...

बॉलिवूड सेलिब्रीटी नेहमी महागड्या वस्तू वापरताना दिसतात. खासकरुन अभिनेत्री लग्जरी ब्रॅन्डच्या शौकीन असतात आणि बऱ्याच वेळा महागड्या कपड्यांसह अनेक महागड्या अॅक्सेसरीज वापरताना दिसतात. या अॅक्सेसरीजमध्ये हॅण्डबॅग पहिल्या क्रमांकावर आहेत. बॉलिवूडची बेबो करिना कपूर, सोनम कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा अनेक वेळा महागड्या बॅग वापरताना दिसतात. नुकताच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या हॅण्डपर्सची किंमत समोर आली आहे.

गेल्या वर्षी वाढदिवस साजरा करताना प्रियांकाने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. ‘देसी गर्ल’च्या हा शॉर्ट ड्रेस 16Arlington या ब्रँडचा आहे. तसेच या ड्रेसची किंमत जवळपास ८५ हजार रुपये आहे. ती या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

तसेच या ड्रेसवर तिने छोटी हॅण्डपर्स घेतली होती. तिची ही लिप्स्टीकच्या आकाराची पर्स Judith Leiber Couture या ब्रँडची आहे. तसेच तिची किंमत जवळपास ४ लाख रुपये आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने १८ जुलै रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. प्रियांकाचा पती निक जोनासने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला केवळ घरातल्या लोकांना बोलवण्यात आले असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 5:56 pm

Web Title: priyanka chopra purse price will leave you in shock avb 95
Next Stories
1 …म्हणून शाहरुखने ‘मन्नत’ बंगला प्लास्टिकने झाकला
2 समांतर 2 मधील ‘ती बाई’ कोण असेल?; स्वप्नील जोशीच्या ट्विटने वाढवली उत्सुकता
3 तापसी-कंगना वादाला अखेर पूर्णविराम; अभिनेत्रीने घेतली माघार
Just Now!
X