बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहू लागलेत. दीपिका-रणवीरनंतर सोनमच्या लग्नाच्या चर्चा काल परवापर्यंत सुरू होत्या. आता या चर्चा मागे पडल्या अन् ‘देसी गर्ल’ प्रियांकाच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. त्याला कारण होतं तिच्या हातात असलेलं ब्रेसलेट.
सध्या आसाम दौऱ्यावर असणाऱ्या प्रियांकाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. यात तिच्या हातात असणाऱ्या ब्रेसलेटनं सगळ्याचंच लक्ष वेधलं होतं. हे ब्रेसलेट नसून मंगळसुत्र होतं तिनं ते फक्त गळ्यात न घालता हातात घातलं होतं अशा चर्चा होत्या. त्यामुळे प्रियांकानं गुपचूप लग्न उरकलं की काय? याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. काल दिवसभर प्रियांकाचं लग्न हा विषय गाजल्यानंतर अखेर या लग्नाबद्दल आणि मंगळसूत्राबद्दल तिनं मौन सोडलं आहे.
‘तर्कविर्तकाचा कहरच झालाय, जरा शांत व्हा! हे मंगळसुत्र नसून इव्हिल आय आहे. माझं लग्न ठरलं की मी तुम्हाला नक्की सांगेन आणि ही बातमी अजिबात गुप्त राहणार नाही.’ असं उपरोधिकपणे ट्विट करत जे काही सोशल मीडियावर सुरू आहे त्याची मज्जाच तिनं घेतली. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिनं आपण एकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो हे मान्य केलं होतं. इतकंच नाही तर आपलं ब्रेक अप झाल्याचंही तिनं सांगितलं होतं. पण तिच्या प्रियकराचं नाव मात्र तिनं गुलदस्त्यात ठेवलं. त्यामुळे प्रियांकाच्या या प्रियकराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तिचे चाहतेही उत्सुक होते.
https://t.co/EkUEgfbO75
Hahahah!heights of speculation! This is an evil eye guys! Calm down! I’ll tell u when I get married and it won’t be a secret! Lol pic.twitter.com/WPdIxXIx1I— PRIYANKA (@priyankachopra) April 30, 2018
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 12:13 pm