देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. अमेरिकन गायक निक जोनससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका विदेशात स्थायिक झाली आहे. विशेष म्हणजे संसारात रमलेली प्रियांका तिच्या करिअरच्या बाबतीतदेखील तितकीच सजग असल्याचं दिसून येतं. अलिकडेच प्रियांकाच्या आगामी चित्रपटाचं बर्लिनमधील चित्रीकरण पूर्ण झालं असून ती पुन्हा लॉस एन्जलिसमध्ये परतली आहे. त्यामुळे सध्या ती पती निक जोनाससोबत तिचा क्वालिटी टाइम व्यतीत करत असल्याचं दिसून येत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रियांकाने नुकताच निकसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिचा क्वालिटी टाइम व्यतीत करत असल्याचं दिसून येत आहे. जिथे माझं मन आहे, तिथेच माझं घर आहे, असं कॅप्शन प्रियांकाने या फोटोला दिला आहे. या फोटोमध्ये तिच्या आणि निकसोबत त्यांचे पाळीव श्वान डायना आणि गिनोदेखील असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, प्रियांका सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. लवकरच ती द व्हाइट टायगर या बॉलिवूडपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि आदर्श गौरवदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत. तसंच या चित्रपटाव्यतिरिक्त ती एका हॉलिवूड चित्रपटातदेखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 2, 2020 6:08 pm