News Flash

लग्न न होण्याच्या बाबतीत प्रियांकाने केला खुलासा

खासगी जीवनाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलतानासुद्धा प्रियांका सावधगिरी बाळगते.

प्रियांका चोप्रा जितकी मादक आणि प्रभावी आहे तितकीच ती सुंदर आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही चांगलीच प्रसिद्ध होताना दिसत आहे. ‘बाजीराव-मस्तानी’नंतर बी टाऊनपासून दूर राहिलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘क्वांटिको २’ या मालिकेमध्ये व्यस्त आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही प्रियांका चोप्रा सध्यातरी लग्न करण्याच्या विचारात नाही. किंबहुना खासगी जीवनाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलतानासुद्धा प्रियांका सावधगिरी बाळगते. पण, प्रियांकाच्या या ‘बिइंग सिंगल’ या स्टेटसमागे दडलंय तरी काय याचा खुलासा तिने एका मुलाखतीमध्ये केला आहे.

चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने यासंबंधीचा खुलासा केला आहे. लग्नाबाबतचा प्रश्न प्रियांकाला विचारला असता त्याचे उत्तर देताना, ‘माझी आजी नेहमीच मला ओरडायची की, घरातली काही कामं आणि जेवण बवनता येत नाही तुला. कोणही लग्न करणार नाही तुझ्यासोबत’, असे प्रियांका म्हणाली. प्रियांकाची ही खास मुलाखत १३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या मुलाखतीचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रियांकाच्या अमेरिकेतील घरामध्ये ही मुलाखत चित्रीत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रियांकाची ही मुलाखत पाहण्यासाठी अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

‘क्वांटिको २’व्यतिरिक्त प्रियांका ‘बेवॉच’ या चित्रपटासह हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात अलेक्झांड्रा दद्दारिओ, इलफेनेश हॅडेरा आणि केली या अभिनेत्री तसेच ड्वेन जॉन्सन (रॉक), झॅक एफरॉन, जॉन बॅस हे कलाकारही झळकणार आहेत. येणाऱ्या काळात प्रियांकाच्या अभिनयाचा चढता आलेख पाहणे अनेकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे यात शंकाच नाही.

वाचा: ‘देसी गर्ल’चे विदेशी ‘लव कनेक्शन’?

दरम्यान, प्रियांका चोप्रा ‘कॉन्ड नास्ट ट्रॅव्हलर’ मासिकात झळकली आहे. या मासिकातील फोटोमुळे प्रियांका सध्या चर्चेत आहे. मासिकात छापून आलेल्या फोटोमध्ये प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा टि शर्ट परिधान केल्याचे दिसते. या टी-शर्टवर लिहलेल्या ‘रेफ्यूजी’, ‘इमिग्रेशन’, ‘आउटसाइडर’, ‘ट्रॅव्हलर’ या चार शब्दांमुळे चाहत्यांनी प्रियांकाच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. या चार शब्दांमधील तीन शब्दांना लाल रंगाने खोडले असून ‘ट्रॅव्हलर’ या शब्दाला तसेच ठेवण्यात आले आहे. या चार शब्दांचा अर्थ लावला तर पहिला शब्द निर्वासित, दुसरा शब्द अप्रवासी आणि तिसरा शब्द बाहेरुन आलेला असा होतो. तर छेडछाड न करता ट्रॅव्हलर हा शब्द तसाच ठेवण्यात आला असून, त्याचा अर्थ इकडे तिकडे भटकत राहणारा अर्थात प्रवासी असा होता.

या चार शब्दांचा नेटीझन्स आपापल्या परिने अर्थ लावत असून प्रियांकाला यातून काय संदेश द्यायचा आहे, याबद्दल विचारणा करत आहेत. निर्वासितांना, अप्रवाशांना आणि बाहेरुन आलेल्यांवर बंदी घालण्याचा संदेश प्रियांकाला द्यायचा आहे का? अशा प्रतिक्रिया ट्विटरवर उमटत आहेत. काहींनी प्रियांका चुकीचा संदेश देत असल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 3:44 pm

Web Title: priyanka chopra revealed the secret behind her marriage
Next Stories
1 शाहरुख-अनुष्काच्या ‘त्या’ नजरेने चाहत्यांना दिला धोका!
2 शाम बेनेगल पाकिस्तानी कलाकारासोबत चित्रपट करण्याच्या तयारीत, फवादला पसंती
3 ‘मोटू पतलू’चा मराठमोळा अंदाज
Just Now!
X