26 January 2021

News Flash

प्रियांकाने मोडले लॉकडाउनचे नियम? स्पष्टीकरण देत म्हणाली…

प्रियांकासोबत तिची आईदेखील होती

ब्रिटनमध्ये वेगाने पसरणाऱ्या करोना विषाणूचा एक नवा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्यात आला आहे. यात लंडनमध्येदेखील लॉकडाउन झाला असून येथील लॉकडाउनचे नियम अभिनेत्री प्रियांका चोप्राने मोडल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या सगळ्या चर्चांवर प्रियांकाने स्पष्टीकरण दिलं आहे.

करोनाच्या नव्या विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असल्यामुळे अनेक देशांनी लॉकडाउन घोषित केला आहे. लंडनमध्येदेखील लॉकडाउन सुरु असून अशा काळात प्रियांका तिच्या आईसोबत एका सॅलॉनमध्ये गेली होती. प्रियांकाला येथे पाहिल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतली आणि तिला नियमांची आठवण करुन दिली. त्यानंतर सोशल मीडियावर प्रियांकाला ट्रोल व्हावं लागलं. मात्र, प्रियांकाने याविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.


प्रियांका सध्या युकेमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. या चित्रपटासाठी तिने तिचे केस कलर केले होते. त्यामुळे तिला सॅलॉनमध्ये जावं लागलं होतं. तसंच ज्यावेळी प्रियांका सॅलॉनमध्ये गेली. त्यावेळी या सॅलॉनमध्ये योग्यती खबरदारी घेण्यात आली होती. तसंच तेथे लॉकडाउनच्या सर्व नियमांचं पालन देखील करण्यात आलं होतं. सॅलॉनमधील प्रत्येकाच्या करोना टेस्ट करण्यात आल्या होत्या, असं स्पष्टीकरण प्रियांकाने दिलं आहे.

वाचा : जामीन मिळाल्यानंतर रियाची पार्टीला हजेरी; मित्राने शेअर केला फोटो

दरम्यान, प्रियांकाला पाहून पोलीस सॅलॉनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना संपूर्ण कागदपत्र दाखवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. बुधवारी संध्याकाळी ५.४४ वाजता प्रियांका जोश वुडच्या सॅलॉनमध्ये गेली होती. प्रियांका लवकरच ‘टेक्स्ट फॉर यू ’ या हॉलिवूडपटात झळकणार आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या ती लंडनमध्ये आहे. मात्र, लॉकडाउन झाल्यामुळे हे चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. परिणामी, प्रियांका तेथेच अडकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 8:49 am

Web Title: priyanka chopra reveals case of violation of lockdown rules in london ssj 93
Next Stories
1 अनीता हसनंदानीने बेबी बंपसह केला शकिरा डान्स, व्हिडीओ व्हायरल
2 ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ मध्ये होणार अंकुश चौधरीची एण्ट्री
3 ‘लॉकडाऊन लग्न’ चित्रपटाचा शुभारंभ!
Just Now!
X