‘क्वांटिको’ मालिकेनं प्रियांका अमेरिकन प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. तिची प्रसिद्धी आणि हॉलीवूडमधला प्रियांकाचा प्रवास थक्क करणारा आहे. पण काही दुर्दैवी अभिनेत्रींसारखा प्रियांकालाही अमेरिकेत वर्णद्वेषाचा सामाना करावा लागला. अमेरिकन प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेल्या प्रियांकानं नुकतीच याची कबुली दिली आहे. सावळ्या रंगामुळे आपल्याला सिनेमा नाकारण्यात आल्याची धक्कादायक महिती तिनं प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

वाचा : अखेर करणच्या नव्या ‘स्टुडंट’ सर्वांसमोर

‘क्वांटिको’ मालिकेत प्रियांका झळकली त्यानंतर प्रियांकाचा गेल्यावर्षी ‘बेवॉच’ हा सिनेमाही आला. यातील प्रियांकाच्या अभिनयाचं सर्वांकडूनच भरभरून कौतुक करण्यात आलं. आणखीही काही चित्रपटासंदर्भात तिचं बोलणं सुरू आहे. पण, हॉलीवूडमध्ये बऱ्यापैकी स्थिरावलेल्या प्रियांकानं तिला येथे सहन कराव्या लागलेल्या वर्णद्वेषाविषयी उघडपणे भाष्य केलं आहे. हॉलीवूडमधल्या एका बड्या दिग्दर्शकानं केवळ सावळी असल्यानं आपल्याला नकार दिल्याचं तिनं मुलाखतीत म्हटलं आहे. ‘या चित्रपटाची बोलणी सुरू असताना मी चित्रपटासाठी योग्य नसल्याचं सांगून त्यांनी मला नकार कळवला. अर्थात ते कारण काय असावं हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. कदाचित मी स्लिम किंवा तितकीशी बोल्ड नसावी यामुळे मला चित्रपट नाकारण्यात आल्याचं मला वाटलं. पण यामागचं खरं कारण माझं हृदय पिळवटून काढणार होतं. मी गौरवर्णीय नाही, माझा रंग सावळा आहे म्हणून मला चित्रपट नाकारला गेल्याचं मला कळलं’ असं ती म्हणाली.

वाचा : कपिलच्या निस्सीम चाहत्यांसाठी ही बातमी ठरू शकते वाईट

याआधीही प्रियांकानं अमेरिकन लोकांच्या मनात असलेल्या वर्णद्वेषाविषयी उघडपणे भाष्य केलं होतं. प्रियांकांचं शालेय शिक्षण अमेरिकेत झालं. बालपणी तिला अनेकदा वर्णद्वेषाचा सामान करावा लागला होता. सावळ्या रंगामुळे तिला वर्गमैत्रींणी ‘ब्राऊनी’ या नावानं चिडवत. अनेकदा आपले वादही होतं. याच कारणानं मी वयाच्या १६ व्या वर्षी अमेरिका सोडून भारतात परत आली असंही ती म्हणाली होती.