News Flash

प्रियांका चोप्राने सांगितला स्ट्रगलिंगच्या काळातील धक्कादायक अनुभव

बॉलिवूडच्या 'देसी गर्ल'साठी इंडस्ट्रीमधील सुरुवातीचा प्रवास काही सोपा नव्हता.

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडमध्ये कुठलाही ‘गॉडफादर’ नसताना दमदार अभिनयाच्या जोरावर जम बसवणं फार कठीण आहे. त्यातही बॉलिवूडमध्ये काम करून नंतर हॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. ‘ऐतराज’, ‘बर्फी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मेरी कोम’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये तिने जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. मात्र हा प्रवास बॉलिवूडच्या ‘देसी गर्ल’साठी काही सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीमध्ये आलेल्या धक्कादायक अनुभवाविषयी प्रियांकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला.

‘वोग’ या प्रसिद्ध मासिकासाठी तिने नुकतेच फोटोशूट केले. फोटोशूटच्या निमित्ताने मासिकाने प्रियांकाची मुलाखत घेतली. या मुलाखतीत तिने १८ वर्षांची असताना इंडस्ट्रीत आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं. ”मी कोणालाच ओळखत नव्हते आणि मला काहीच माहीत नव्हतं. दिग्दर्शक माझ्यावर ओरडायचे. बऱ्याच चित्रपटांमधून मला काढून टाकण्यात आलं होतं,” असं तिने सांगितलं. या कठीण काळात तिच्या बाबांनी तिला खूप साथ दिली.

इतरांचं लक्षपूर्वक ऐकायचं आणि स्वत: कमी बोलायचं, हा मोलाचा संदेश बाबांनी दिला असं ती सांगते. ”बाबांनी दिलेला हाच सल्ला मी आयुष्यभर पाळत आहे. आत्मविश्वासाने कसं वावरायचं हे मी स्वत:ला शिकवलं. अपयशानंतर तुम्ही कसे पुढे येता किंवा कसे वागता त्यावरून तुमचं यश ठरतं हा धडा मी इंडस्ट्रीकडून घेतला,” असं प्रियांका म्हणाली.

आता कुटुंबाकडे अधिक लक्ष देण्याचा विचार असल्याचं सांगत तिने आई होण्याची इच्छाही या मुलाखतीत व्यक्त केली. तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत फरहान अख्तर, झायरा वसीम प्रमुख भूमिकेत आहेत. तीन वर्षांनी प्रियांकाचा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 11:04 am

Web Title: priyanka chopra reveals how she dealt with failure in early days of her career ssv 92
Next Stories
1 … म्हणून मालिकांना पडले ‘डेली सोप’ असे नाव
2 वाढदिवशी अक्षय कुमारकडून चाहत्यांना विशेष भेट, केली ‘ही’ घोषणा
3 ‘या’ अभिनेत्रीमुळे अक्षय कुमारला मिळाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री
Just Now!
X