News Flash

पुन्हा एकदा हॉलिवूडपटात झळकणार ‘देसी गर्ल’; जाणून घ्या, तिच्या प्रोजेक्टविषयी

हॉलिवूडपटात प्रियांकाची महत्त्वपूर्ण भूमिका

देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका विदेशात स्थायिक झाली आहे. विशेष म्हणजे आता प्रियांकाचा हॉलिवूडमधील वावर वाढला असून ती लवकरच एका नव्या हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. याविषयी एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली.

प्रियांका लवकरच ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात झळकणार असून त्याचं दिग्दर्शन जिम स्ट्रॉज करणार आहेत. उत्तम कलाकारांसोबत चित्रपटात काम करण्याची मनापासून उत्सुकता आहे. जिम स्ट्रॉस, सॅम ह्यूहान, सेलीन डायऑन. ही संधी फार मोठी आहे. चला सुरुवात करुयात, अशी पोस्ट प्रियांकाने केली आहे.

दरम्यान, ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटाची कथा ‘एसएमएस फर दिच’वर आधारित आहे. या चित्रपटाची कथा एका महिलेभोवती फिरत असून तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्याच नंबरवरुन तिला सतत काही मेसेज येतात. त्यानंतर हे मेसेज कोण करतं हे चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 3:51 pm

Web Title: priyanka chopra sam heughan and celine dion to star in text for you dcp 98 ssj 93
Next Stories
1 प्रसिद्ध अभिनेत्री अपराजिता यांना करोनाची लागण
2 काजलच्या घरी लगीनघाई! बहिणीने शेअर केला खास फोटो
3 अमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली…
Just Now!
X