News Flash

रेड कार्पेटवर वॉक करण्याआधी माझ्या ड्रेसची चेन तुटली अन्…, प्रियांकाने सांगितला किस्सा

तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत किस्सा सांगितला आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा कधी सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. प्रियांकाचे कपडे हे नेहमीच इतरांपेक्षा हटके असतात. प्रियांकाने बोल्ड ड्रेस परिधान केला तरी ती एकदम सहजपणे कॅमेरासमोर वावरताना दिसते. मात्र, प्रियांकाने एक फोटो शेअर करत रेड कार्पेटवर वॉक करण्याआधी तिच्या ड्रेसची चेन तुटल्याचे सांगितले आहे.

प्रियांकाचा हा व्हायरल झालेला फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो गेल्या वर्षीच्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने काळ्या आणि लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत प्रियांकाने एक किस्सा सांगितला आहे.

“या फोटोत मी एकदम शांत दिसत असले तरी सर्वांना माहिती होते की मी खूप घाबरले होते. कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तयार होताना अचानक या विंटेज ड्रेसची चेन तुटली होती. मग आता त्यावर उपाय काय? तर माझ्या संपूर्ण टीमने कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला पोहोचण्यासाठी लागणाऱ्या ५ मिनिटांच्या कालावधीमध्ये कार राईडमध्ये तो ड्रेस शिवला होता” असे प्रियांका म्हणाली.

आणखी वाचा- कतरिनाने शेअर केला तिचा डायट प्लान, नेटकरी झाले खूश

पुढे ती म्हणाली की, “मेट गाला, मिस वर्ल्ड आणि माझ्या आठवणीतील यासारख्या आणखी अनेक बीटीएस गोष्टी जाणून घ्या #अनफिनिश्ड! या पुस्तकात”

प्रियांकाने तिच्या आयुष्यातील असे अनेक किस्से तिच्या अनफिनिश्ड या पुस्तकात सांगितले आहे. या पुस्तकात तिचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता या बद्दल तिने लिहले असून तिच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटना देखील असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 2:34 pm

Web Title: priyanka chopra says her zip was broken before her red carpet walk dcp 98 avb 95
Next Stories
1 26/11चे हीरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना महेश बाबूंचा ‘सलाम’, सिनेमाच्या रिलीज डेटची केली घोषणा
2 नीतू कपूर यांनी शेअर केला ऋषी कपूर यांच्या सोबतचा पहिला डान्स व्हिडीओ
3 संजय जाधव दुनियादारी करायला सज्ज; ‘या’ मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण
Just Now!
X