11 August 2020

News Flash

“थप्पड नहीं काम से मारो”; अनुभव सिन्हांच्या ‘त्या’ ट्विटवर प्रियांकाची प्रतिक्रिया

प्रियांकाने केला अ‍ॅमेझॉनसोबत कोट्यवधींचा करार

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अ‍ॅमेझॉनसोबत कोट्यवधींचा करार केला आहे. हा करार एका टीव्ही सीरिज संबंधीत आहे. या करारासाठी दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी प्रियांकाचे कौतुक केले. त्यांच्या कौतुकावर प्रतिक्रिया देताना प्रियांकाने एक चकित करणारे ट्विट केले. टीकाकारांना आपल्या कामाने मारा, असं ती म्हणाली आहे.

अवश्य पाहा – ‘ऑस्कर’मध्येही घराणेशाही? हृतिक आणि आलियाला अ‍ॅकेडमी अवॉर्डचे आमंत्रण

काय म्हणाले होते अनुभव सिन्हा?

“मला बॉम्बे टाईम्समधील तो लेख आठवतोय ज्यामध्ये म्हटलं होतं त्यांना कोणीही हात लावू शकत नाही.” अशा आशयाचे ट्विट करुन अनुभव सिन्हा यांनी प्रियांकाचे कौतुक केले होते. त्यांच्या या ट्विटवर धन्यवाद देताना प्रियांका म्हणाली, “चपराक नाही, त्यांना आपल्या कामाने मारा. पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद अनुभव सिन्हा.” प्रियांकाचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वधून घेत आहे.

अवश्य पाहा – “जय जय महाराष्ट्र माझा”; पूजा भट्टनं केलं लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचं कौतुक

प्रियांकाने अ‍ॅमेझॉनसोबत एका नव्या टीव्ही सीरिजची निर्माता म्हणून करार केला आहे. सुरुवातीला या करारासाठी अ‍ॅमेझॉनच्या टीममधील काही सदस्यांनी विरोध केला होता. परंतु या विरोधाचा सामना करत प्रियांकाने हा करार यशस्वी करुन दाखवला. म्हणून अनुभव सिन्हा यांनी तिचे कौतुक केले होते. व त्यांच्या ट्विटमध्ये या विरोधाचा संदर्भ होता. प्रियांकाने देखील लढण्यापेक्षा कामातून उत्तर दिलं, असं म्हणत त्यांना धन्यवाद म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 11:35 am

Web Title: priyanka chopra says kill them with your work mppg 94
Next Stories
1 Video : ‘पवित्र रिश्ता’मधील सुशांत-अंकिताचं प्रदर्शित होऊ न शकलेलं गाणं व्हायरल
2 “टीकेमुळे मी विचलित होत नाही”; पूजा भट्टने ट्रोलर्सवर साधला निशाणा
3 मी देखील घराणेशाहीचा शिकार – सैफ अली खान
Just Now!
X