अभिनेत्री प्रियांका चोप्रा बऱ्याच वेळा तिच्या फॅशनसेन्समुळे चर्चेत येत असते. प्रियांका अनेक वेळा नव्या फॅशन कॅरी करताना दिसते. यात बऱ्याचदा तिला ट्रोलही व्हावं लागतं. मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करुन प्रियांका तिची आवड जपत असते. यामध्येच सध्या प्रियांकाच्या एका डेनिम फ्रॉकची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. या ड्रेसची किंमत सध्या चाहत्यांमध्ये चर्चिली जात आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने डेनिमचा एक ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस अत्यंत साधा दिसत असून त्याची किंमतदेखील तशीच आहे. अनेक वेळा सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांचे महागडे कपडे चर्चेत असतात. परंतु, प्रियांकाचा हा ड्रेस अत्यंत साधा आणि कमी किंमतीचा आहे.
प्रियांकाचा हा डेनिम फ्रॉक शॉर्ट लेंथचा असून त्याला स्क्वेअर नेकलाइन आहे. तर फूल स्लिव्ह आहेत. त्यामुळे हा ड्रेस अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. परंतु, प्रियांकाच्या स्टारडमनुसार या ड्रेसची किंमत कमी आहे. हा ड्रेस केवळ ९ हजार ५९१ रुपयांचा आहे. त्यामुळे अनेकांचं लक्ष प्रियांकाकडे वेधलं आहे.
दरम्यान, प्रियांका कायम तिच्या फॅशनमुळे चर्चेत येत असते. अनेक वेळा सेलिब्रिटी एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा वापरत नाहीत. परंतु, प्रियांका कायम ड्रेस रिपीट करत असते. त्यामुळे तिच्यातील या स्वभावाचीही चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 3:24 pm