करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसलाय. करोनामुळे देशात अत्यंत वाईट आणि हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने लसींसोबतच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. अशात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आले आहेत. तर अनेक जण मदतीचं आवाहन करत आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राही सध्या लंडनमध्ये असली तरी ती सोशल मीडियावरून देशातील घडामोडींवर तिचं मत मांडत आहे. भारतातील वाढत्या करोनाच्या स्थितीवर तिने दु:ख व्यक्त केलंय. सोशल मीडियावरून ती मदतीचं आवाहन करतेय.

नुकताच प्रियांका चोप्राने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात तिने जगभरातील लोकांना मदतीसाठी पुढे येणाचं आवाहन केलं आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ची म्हणालीय, ” भारत माझा देश, माझं घरं आहे. सध्या तो करोनाच्या संकटाशी लढतोय. आपल्या सर्वांची देशाला गरज आहे. रुग्णांची संख्या वाढतेय, मृतांचा आकडादेखईल वाढतोय. त्यामुळे एकत्र येणं गरजेचं आहे.”

पुढे ती म्हणाली, “मदतीसाठी मी गिव्हइंडियासोबत एकत्र येत एका संस्थेची स्थापना केली आहे. तुम्ही यात तुमचं योगदान देऊ शकता, यामुळे बराच फरक पडेल. मला 63 मिनियन लोक फॉल करतात. प्रत्येकाने 10 डॉलर दिले तरी मोठी रक्कम जमा होईल. ही रक्कम थेट आरोग्य सुविधेसाठी दिली जाईल.” अशी माहिती तिने या पोस्टमध्ये दिली आहे. शिवाय तिने अनेकांना कृपया ‘मदत’ करा असं आवाहन केलं आहे.

“मी आणि नीक शक्य ती मदत करत आहोत ” असं ती म्हणाली. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना टॅग करत एक ट्विट केलं होतं. यात तिने आभार मानत भारत देशाला करोनावरील लस कधी पाठवणार आहात ? असा सवाल देखील केला होता.