News Flash

प्रियांकाने शेअर केला ‘सिटाडेल’च्या सेटवरून BTS फोटो

प्रियांकाचा हा फोटो झाला व्हायरल

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. प्रियांकाचे लाखो चाहते आहेत. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान, प्रियांकाने ‘सिटाडेल’ या तिच्या आगामी सीरिजच्या सेटवरून एक फोटो शेअर केला. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियांकाने सोनेरी फेस मास्क लावला आहे. हा फोटो शेअर करत प्रियांकाने ‘कॅप्शन दिस’ म्हटलं आहे. प्रियांकाने पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे.

 

प्रियांका चोप्रा सध्या लंडनमध्ये असून रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ सीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ‘सिटाडेल’मध्ये ती हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडनसोबत दिसणार आहे. प्रियंका गेल्या वर्षी ‘टेक्स्ट फॉर यू’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेली होती.

‘द व्हाइट टायगर’ हा प्रियांकाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियांकासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता राजकुमार राव आणि आदर्श गौरव होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिची स्तुती करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:20 pm

Web Title: priyanka chopra shared a photo from her upcoming series citadel set see the bts photo dcp 98
Next Stories
1 “प्रियांका चोप्राची बहीण असल्याने मला बॉलिवूडमध्ये काम मिळालं नाही”, मीरा चोप्राचा खुलासा
2 स्मिता पाटील… प्रतिक बब्बरने छातीवर काढला आईच्या नावाचा टॅट्यू
3 ‘हा’ मराठमोळा अभिनेता अडकणार दुसऱ्यांदा लग्नबंधनात
Just Now!
X