01 March 2021

News Flash

प्रियांकाने शेअर केला निकसोबतचा सोफ्यावरील रोमॅण्टिक फोटो आणि…

या फोटोत पती निक जोनाससोबत प्रियांका...

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. प्रियांकाने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत निकसाठी एक पोस्ट शेअर केली होती. आता प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती निक जोनाससोबतचा आणखी एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत पती निक जोनासोबत प्रियांकाची लाडकी श्वान ‘डायना’ सुद्धा आहे. हा फोटो लंडनमधला असून तिची आई मधु चोप्रा यांनी काढला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाची लाडकी डायना कोटमध्ये आहे. या कोटसाठी तिने आभार मानले आहेत. प्रियांका आणि निक सोफ्यावर असून रोमँटिक मूडमध्ये आहेत.

रुमच्या एका कोपऱ्यात ख्रिसमस ट्री आहे. या फोटोत प्रियांका आणि निक रोमान्सच्या मूडमध्ये दिसतात. या फोटोवर प्रियांकाच्या अनेक चाहत्यांनी हार्टचा फोटो टाकून कमेंट केली आहे. काहींनी ‘हाऊ स्वीट’ अशी सुद्धा कमेंट केली आहे.

लॉकडाऊनमध्ये प्रियांकाने पती सोबत कसा घालवला वेळ?
काही दिवसांपूर्वी निकने एका मुलाखतीत लॉकडाऊनच्या दिवसातला प्रियांकासोबतचा अनुभव कसा होता? त्यांनी एकत्र वेळ कसा घालवला? त्याबद्दल सांगितले. करोना व्हायरस नसता, तर आम्हाला इतका चांगला एकत्र क्वालिटी टाइम घालवणे शक्य झाले नसते, असे निक जोनास म्हणाला होता. लॉकडाऊनमध्ये मी आणि प्रियांका एकत्र होतो. हा सुद्धा एक चांगला अनुभव होता. आमच्या ज्या कल्पना आहेत, त्यावर आम्ही बराच वेळ चर्चा केली. परस्परांशी आमच्या आयडिया शेअर केल्या. आम्ही दोघे एकत्र अनेक गोष्टींवर काम करतोय असे निक म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 6:20 pm

Web Title: priyanka chopra shares a pic with nick jonas from london dmp 82
Next Stories
1 ‘नक्सलबाडी’ वेब सीरिजला प्रेक्षक-समीक्षकांची पसंती
2 ‘कॉन्ट्रॉव्हर्सी केली पण कधी.. ‘; बिग बॉसमध्ये राखी सावंत व्यक्त
3 “दिलजीत आणि प्रियांका शेतकऱ्यांची माथी भडकावतायेत”; कंगना रणौतचा हल्लाबोल
Just Now!
X