News Flash

प्रियांका चोप्राने सांगितले सुखी संसाराचे रहस्य ; म्हणाली, “फक्त दोनच वर्ष झाली आहेत लग्नाला म्हणून….”

लग्नाच्या राजेशाही आयोजनावर दिली प्रतिक्रिया

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनया व्यतिरिक्त खाजगी आयुष्यामुळेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. प्रियांका तिच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून नेहमीच स्वतःच्या खाजगी आयुष्यातील आणि पती निक जोनासच्या सोबतच्या अनेक गोष्टी शेअर करत असते. प्रियांका चोप्राने डिसेंबर २०१८ मध्ये अमेरिकन गायक निक जोनाससोबत राजस्थानच्या उमेद भवनमध्ये लग्न केलं. बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास त्यांच्या लग्नानंतर नेहमीच एकत्र एन्जॉय करताना दिसतात.

लग्नाच्या दोन वर्षानंतर आता प्रियांका चोप्राने सुखी संसारातील काही गोष्टींचा खुलासा केलाय. नुकताच प्रियांका चोप्राने एका ऑस्ट्रेलियन मासिकासाठी मुलाखत दिलीये. यावेळी तिने एक उत्तम आणि सुखी संसारासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, याच्या टिप्स तिने शेअर केल्या आहेत. या मुलाखतीत तिने पती निक जोनाससोबतच्या सुखी संसारातील काही गुपितं देखील शेअर केली आहेत. यावेळी ती म्हणाली, “एकमेकांसोबत वेळ घालवणं आणि जास्तीत जास्त संवाद असणं ही सुखी संसाराची लक्षणं आहेत.”

यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्राला तिच्या सुखी संसारामागच्या रहस्यांबाबत विचारल्यानंतर म्हणाली, “माझ्या लग्नाला फक्त दोनच वर्ष झाली आहेत, त्यामुळे मला तुम्हाला आता जास्त काही सांगता येणार नाही…माझ्या मते एकमेकांमध्ये संवाद होणं महत्त्वाचं असतं…सोबतच एकत्र बसून एकमेकांसोबत वेळ घालवणं, जास्तीत जास्त गप्पा मारणं, मुळात या गोष्टींचा आनंद घेतला पाहीजे.” यापुढे बोलताना प्रियांका चोप्राने तिच्या लग्नाच्या भव्य दिव्य आयोजनावर देखील प्रतिक्रिया दिली.

प्रियांका चोप्रा म्हणाली, “आमच्याकडे फक्त दोनच महिने होते आणि विचार सुद्धा करायला वेळ नव्हता…जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला तीच योग्य वेळ होती…”. गेल्या दोन वर्षांपासून निक जोनाससोबत सुखी संसाराचा गाडा ओढणारी प्रियांका चोप्रा तिच्या सोशल मीडिया अकाउंट बरीच सक्रिय असते. ती नेहमीच पती नीक जोनाससोबतचे फोटोज आणि व्हिडीओज देखील शेअर करत असते. नुकतंच प्रियांकाने निकसोबतचा एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे.

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नीकसोबतचा रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. यात दोघेही एकमेकांमध्ये बुडालेले दिसून येत आहेत. तिने एकूण चार फोटोज शेअर केले आहेत. यातल्या दोन फोटोंमध्ये ती निकसोबत तर बाकीच्या दोन फोटोंमध्ये ती एकटी पोज देताना दिसून येत आहे. या फोटोंमध्ये प्रियांकाने स्किन कलरचा शिमर हायस्लिट ड्रेस परिधान केलेला आहे. यात ती खूपच हॉट लूकमध्ये दिसून येत आहे. तर निक जोनास हिरव्या रंगाच्या कोट पॅंटमध्ये दिसून येत आहे.


तिने शेअर केलेल्या या फोटोंना प्रियांका आणि निक दोघांच्या चाहत्यांनी भरभरून लाइक आणि कमेन्ट केल्या आहेत. प्रियांकाने केलेलं हे फोटो बिलबोर्ड संगीत पुरस्कारांमध्ये काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. हा सोहळा निक जोनास होस्ट करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 12:29 pm

Web Title: priyanka chopra shares her secret behind good marriage after 2 years of marriage with nick jonas prp 93
Next Stories
1 जातिवाचक शब्दांचा उल्लेख करणं अभिनेत्री युविका चौधरीला महागात; नेटकऱ्यांकडून अटकेची मागणी
2 लेकाची बाजू घेत उदित नारायण यांनी साधला अमित कुमार यांच्यावर निशाणा
3 प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार Money Heist चा पाचवा सीझन
Just Now!
X