बॉलिवूडची देली गर्ल प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनस हे लोकप्रिय कपल्स पैकी एक आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकामुळे प्रियांका चर्चेत आहे. पुस्तकाच्या प्रमोशनसाठी प्रियांकाने अनेक मुलाखती दिल्या. त्यामधील एका मुलाखतीत प्रियांकाने लग्नाआधी निकची हेरगिरी केली होती असं सांगितलं आहे.
‘द मॉर्निंग शो’ या शोमध्ये आल्यानंतर प्रियांकाला पुस्तकातील अनेक गोष्टींवर प्रश्न विचारण्यात आले होते. “भारतात असताना निक तुझ्या आईला लंचला बाहेर घेऊन गेला होता, तेव्हा तुला ती गोष्ट खटकली होती का?” असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला होता. त्यावर प्रियांका म्हणाली, “जे लोकं मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मला माझ्या आजूबाजूच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायला आवडते. माझी एक मीटिंग होती. मी निकला म्हणाले माझी मीटिंग आहे तू काय करणार? तर तो म्हणाला तू माझी काळजी करू नकोस मी मुंबईत आहे. मी तुझ्या आईला लंचला घेऊन जाईल. हे माझ्यासाठी थोडे विचित्र होतं. कारण आम्ही काही महिन्यांपासूनच सोबत होतो. त्यात माझी आई आणि निक एकटे जाणार. म्हणून मी माझ्या बॉडीगार्डला त्यांचे फोटो काढून पाठवायला सांगितले. जेणे करुन मला त्यांच्या देहबोलीचा अभ्यास करता येईल.”
Would you spy on your spouse? @priyankachopra did
MORE: https://t.co/pjFSZIW6aO@nickjonas pic.twitter.com/opTYYuJe6b— The Morning Show (@morningshowca) February 9, 2021
प्रियांकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक ९ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाले होते. या पुस्तकात प्रियांकाने तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या पुस्तकातील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. प्रियांकाचे हे पुस्तक बेस्ट सेलर बूक ठरलेलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 3:01 pm