News Flash

A Kid Like Jake : दुसऱ्या हॉलिवूडपटाच्या ट्रेलरमध्येही अवघ्या काही सेकंदांसाठी झळकली ‘देसी गर्ल’

प्रियांकाची भूमिका असलेला 'अ किड लाइक जेक' हा सिनेमा येत्या काही महिन्यांत प्रदर्शित होत आहे. तिनं आधी साकरलेल्या ग्लॅमरस भूमिकेपेक्षा ही नक्कीच वेगळी असणार आहे.

प्रियांकादेखील यात एका आईची भूमिका साकारताना दिसणार आहे.

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पुन्हा एका नव्या हॉलीवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांकाच्या दुसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि यात प्रियांका एका वेगळ्या भूमिकेत तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. प्रियांकाची भूमिका असलेला A Kid Like Jake ‘अ किड लाइक जेक’ हा सिनेमा येत्या काही महिन्यांत प्रदर्शित होत आहे.

वाचा : हॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रालाही बसली वर्णद्वेषाची झळ

ज्याचं मन परिकथेत रमतं, ज्याला मुलींसारखे कपडे परिधान करायला आवडतात अशा जेक नावाच्या लहान मुलगा आणि त्याच्या आई- वडिलांभोवती  ‘अ किड लाइक जेक’ची कहाणी फिरते. जेक इतर मुलांसारखा नाहीये, त्याला मुलींसारखा स्कर्ट घालणं, तसेच लांब केस ठेवणं या गोष्टी खूप आवडतात. या छोट्या मुलाचं संगोपन नेमक करायचं कसं, त्याला मुलगा म्हणून वाढवायचं की मुलगी म्हणून अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या पालकांची धडपड यात दाखवली आहे. आपल्या मुलाच्या वागण्यानं लोक काय म्हणतील? त्याचं भविष्य काय असेल? अशा नाना प्रश्नांच्या जाळ्यात अडकलेल्या पालकांची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

वाचा : पंतप्रधानांची भेट घेताना प्रियांकाने टाळली ‘ती’ चूक

यात प्रियांकाही दिसणार आहे. प्रियांकादेखील यात एका आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रियांकाचा हा दुसरा सिनेमा आहे. चाहत्यांना प्रियांकाची अवघी तीन सेकंदाची छोटीशी झलक यात पाहायला मिळाली आहे. प्रियांकाच्या ‘बेवॉच’ सिनेमाचा पहिला ट्रेलर ज्यावेळी प्रदर्शित करण्यात आला होता त्यावेळीदेखील काही सेकंदासाठी ती यात दिसली होती. त्यामुळे तिचे चाहते काहीसे नाराज आहेत पण, तिनं आधी साकरलेल्या ग्लॅमरस भूमिकेपेक्षा ही नक्कीच वेगळी असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 4:46 pm

Web Title: priyanka chopra stars in her second hollywood movie a kid like jake first trailer
Next Stories
1 परीक्षेला जाण्यापूर्वीच पास झाला हा ‘कच्चा लिंबू’
2 65th national film awards : ‘पावसाचा निबंध’च्या नावानं चांगभलं- नागराज मंजुळे
3 सलमानशी बिघडलेले नाते नव्याने जोडण्याचा अर्जुन कपूरचा प्रयत्न
Just Now!
X