News Flash

दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन प्रियांकाने केली प्लास्टिक सर्जरी? देसी गर्लने केला ‘त्या’ गोष्टीचा खुलासा

'अनफिनिश्ड' या पुस्तकामुळे प्रियांकाच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. प्रियांका सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. आज प्रियांकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी तिने एका मुलाखतीत प्लास्टिक सर्जरी विषयी वक्तव्य केले होते आणि त्या घटनेचा उल्लेख पुस्तकात देखील केला आहे.

एशियन स्टाइल मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांकाला प्लास्टिक सर्जरी विषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी ती म्हणाली, ‘मला कोणालाही उत्तर द्यावे लागेल असे मी माझ्या पुस्तकात लिहिलेले नाही. मी माझ्या जीवनातील अनेक गोष्टींचा या पुस्तकात उल्लेख केला आहे.’

‘The Independent’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रियांकाने तिच्या पुस्तकात तिच्या प्लास्टिक सर्जरीचा उल्लेख केला आहे. प्रियांकाने या घटनेचा उल्लेख करताना म्हटले आहे की, २००० मध्ये मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यानंतर एका दिग्दर्शकाची तिने भेट घेतली होती. त्या दिग्दर्शकाने/ निर्मात्याने मला वॉक करायला सांगितले. त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि माझ्या शरीररचनेत काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. छाती, नितंब आणि हनुवटीवर काही शस्त्रक्रिया करावी लागेल असं त्यांनी मला सांगितलं. मला अभिनेत्री व्हायचे असेल तर मला हे सर्व करावे लागेल असे त्यांनी मला सांगितले. ते लॉस एंजेलिसमधल्या एका डॉक्टरला ओळखत होते, ज्याच्याकडे जाण्याचा त्यांनी मला सल्ला दिला होता. त्यावेळी माझे जे मॅनेजर होते त्यांनी या दिग्दर्शकाच्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या. त्या दिग्दर्शकासोबत करार करुन त्यांनी पाठवला होता” या संपूर्ण घटनेमुळे प्रियांका दु:खी झाली आणि तिने तिच्या मॅनेजर पासून लांब राहण्याचे ठरवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2021 7:02 pm

Web Title: priyanka chopra talkes about her plastic surgery in her book unfinished dcp 98 avb 95
Next Stories
1 राजीव कपूर यांच्या निधनानंतर पुतणी करिना कपूरने केली पोस्ट, म्हणाली…
2 अरे बापरे! एकाच चित्रपटातून १४ नवोदित कलाकार करणार कलाविश्वात एण्ट्री
3 रेखा आणि विनोद मेहरा यांनी गुपचुप लग्न केले होते का?, उत्तर देत मुलगी सोनिया म्हणाली..
Just Now!
X