दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमधून हॉलिवूडपर्यंत मजल मारणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडच्या ‘क्वांटिको’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या व्यस्त कामकाजातून वेळ काढत तिने एका मुलाखतीला हजेरी लावली. आपल्या अदांनी सर्वांना घायळ करणारी देसी गर्ल यावेळी स्वत:च घायाळ झाली आहे असं म्हणावं लागेल.
‘देसी गर्ल’ ते ‘क्वांटिको गर्ल’ असा प्रवास करणारी प्रियांका यावेळी एका विशेष कारणामुळे ट्रोल झाली आहे. एका मुलाखतीदरम्यान प्रियांकाने परिधान केलेल्या कपड्य़ांमुळे ती जास्त चर्चेत आली आहे. प्रियांकाने फॅशनच्या नावाखाली नव्या डिझाइनचा ड्रेस घातला होता. मात्र या ड्रेसचे कौतुक होण्याऐवजी तिला नेटक-यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. एवढेच नाही तर एका नेटक-याने ‘माझ्या आईने हा ड्रेस बघून रफ्फू करायला दिला’ असता’ असेही सांगितले.

प्रियांकाने यावेळी निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसची डिझाइन चाहत्यांच्या पसंतीत न उतरल्याचे दिसून आले. देसी गर्ल आता पूर्णपणे अमेरिकन झाली आहे, अशी टीका तिच्यावर एका चाहत्याने केली आहे.

वाचा: ‘राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार न मिळाल्यानं मला अत्यंत अपमानास्पद वाटलं’

 

यापूर्वीही प्रियांका तिच्या कपड्यांवरुन ट्रोल झाली होती. जर्मनीमध्ये ‘बेवॉच’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेल्या प्रियांकाने बर्लिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी देखील तिला तिने घातलेल्या कपड्यांमुळे चाहत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते. इतकेच नाही तर तिला कपडे घालण्याची पद्धत आणि परिस्थितीचे भान नसल्याचेही नेटक-यांनी म्हटले होते.