News Flash

“लोकांना गॉसिप पाहिजे”, ‘अनफिनिश्ड’ पुस्तकाला मिळालेल्या नकारात्मक रिव्ह्यूवर प्रियांकाने केलं भाष्य

प्रियांकाने 'अनफिनिश्ड' या पुस्तकात तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

priyanka chopra, unfinished,
प्रियांकाने 'अनफिनिश्ड' या पुस्तकात तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांकच्या आयुष्यावर आधारीत ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. या पुस्तकात प्रियांकाने मिस इंडिया, मिस वर्ल्ड ते हॉलिवूड स्टार होईपर्यंतचा तिचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे. एवढंच नाही तर त्यात पुस्तकात तिने अनेकांची ओळख उघडपणे सांगितली आहेत. यावरून तिला अनेकांनी ट्रोल केले आहे.

प्रियांकाला एका मुलाखतीत विचारण्यात आले की ‘पुस्तकात तिने अनेक लोकांची ओळख उघडपणे सांगितली आहे तर त्यात तिला काही संकोच आहे का?’ यावर नकार देत प्रियांका म्हणाली, ‘ही दुसऱ्या कोणाची कहाणी नाही माझी आहे. यात प्रियांकाची कहाणी असं म्हटलं आहे, त्यामुळे ही माझी कहाणी आहे. हे खरोखरच मजेदार आहे. मी काही लोकांचे रिव्ह्यू वाचले ज्यात ते म्हणाले होते की, अरे ते असं नव्हतं, तिने या गोष्टींबद्दल सत्य सांगितलं नाही. माझं असं झालं की, तुम्हाला माझ्या पुस्तकाग गॉसिप पाहिजे होती.’

आणखी वाचा : “…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”; ‘तारक मेहता…’फेम मुनमुन संतापली

आणखी वाचा : मुनमुन दत्तानंतर ‘तारक मेहता..’ फेम राजने सोशल मीडियावरुन रिलेशनशिपबद्दल केलं भाष्य

प्रियांका पुढे म्हणाली, ‘हेच कारण आहे, मला खरंच आनंद झाला की संपूर्ण जगात माझं पुस्तक बेस्टसेलर पुस्तक ठरलं. मी अशी व्यक्ती नाही जिच्याविषयी लोक त्यांची प्रतिक्रिया देणार नाहीत. प्रियांकाने बऱ्याच लोकांची नावं न घेता, तिच्या बॉलिवूड करिअरच्या सुरुवातीला तिच्यासोबत झालेल्या काही दुर्दैवी घटनांविषयी सांगितले आहे. एका दिग्दर्शकाने प्रियांकाला बूब जॉब आणि कॉस्मॅटिक एन्हांसमेंट करायला सांगितले होते,’ अशाच अनेक गोष्टी प्रियांकाने या पुस्तकात सांगितल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 1:32 pm

Web Title: priyanka chopra unfinished negative reviews says people want gossip in her autobiography dcp 98
Next Stories
1 रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर; मापगावमध्ये घेतली ९० गुंठे जागा
2 “हा आमचा जिगरचा तुकडा”; नीति मोहनने शेअर केलेला फोटो चर्चेत
3 मोदी, अक्षय कुमार यांच्यानंतर आता बेयर ग्रिल्ससोबत झळकणार ‘सिंघम’
Just Now!
X