ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दिलीप कुमार यांची प्रकृती सुधारावी, यासाठी चाहत्यांनी प्रार्थनाही केली होती. रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर बॉलिवू़डमधील तारे-तारकांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूसही केली. काही दिवसांपूर्वीच किंग खान शाहरुखने त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशिर्वादही घेतले होते. आता प्रियांका चोप्रानेही त्यांची भेट घेतली आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्यासोबत तिने संध्याकाळ व्यतीत केली.
दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. ‘प्रियांका चोप्राने दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्यासोबत संध्याकाळची वेळ घालवली. दिलीप कुमार यांची प्रकृती उत्तम आहे,’ अशी माहिती या फोटोंसोबत देण्यात आली.
.@priyankachopra spent the evening with Saab and Saira Baji. Saab's health much better. -FF pic.twitter.com/T9N5vDYp5I
— Dilip Kumar (@TheDilipKumar) September 4, 2017
वाचा : कंगनाला ‘शट-अप’ म्हणताच नेटीझन्सनी करणला केलं ट्रोल
मूत्रपिंडाच्या समस्येमुळे दिलीप कुमार यांना गेल्या महिन्यात मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली होती. सोशल मीडियावरही अनेकांनी पोस्टद्वारे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 5, 2017 1:04 pm