24 November 2020

News Flash

आणखी एका हॉलिवूडपटात ‘देसीगर्ल’ची वर्णी; ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर प्रदर्शित

पाहा, 'वी कॅन बी हिरोज'चा टीझर

‘देसी गर्ल’ ते ‘क्वांटिको गर्ल’ असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाइफमुळे. सध्या प्रियांकाच तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली असून ती लवकरच वी कॅन बी हिरोज या हॉलिवूडपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वी कॅन बी हिरोज या चित्रपटाची माहिती दिली असून सोबत टीझर शेअर केला आहे.विशेष म्हणजे या टीझरमधून प्रियांका पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमधून सुपरहिरो आणि एलियन यांच्यातील युद्ध दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे सगळे सुपरहिरो लहान मुलं आहेत.


“चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना फार मज्जा आली. दिग्दर्शक रॉबर्ट रॉड्रिग्ज आणि या लहान मुलांसोबत छान वेळ गेला. विशेष म्हणजे या मुलांच्या विरुद्ध भूमिका साकारण्याचा छान अनुभव मिळाला. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे”, असं कॅप्शन प्रियांकाने या टीझरला दिलं आहे.

दरम्यान, प्रियांका ‘द व्हाइट टायगर’ या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या चित्रपटात प्रियांका सोबत राजकूमार राव मुख्य भुमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर हॉलिवूड मधील ‘मॅट्रिक्स 4’ आणि ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटांमध्ये प्रियांका दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 3:24 pm

Web Title: priyanka chopra we can be heros movie teaser released dcp98
Next Stories
1 अनुपम खेर यांचा मुलगा झाला बेरोजगार?; सोशल मीडियावरुन मागतोय काम
2 Bigg Boss च्या घरात होणार एकता कपूरची एंट्री; मिर्झापूरचा मुन्ना भैय्याही सोबत दिसणार
3 अभिनेता निखिल द्विवेदीला झाली करोनाची लागण
Just Now!
X