News Flash

तिरंग्याच्या दुपट्ट्याचे ‘बूमरँग’ प्रियांकावरच उलटले!, नेटिझन्सकडून टीका

एका युजरने शिवीगाळ करत, 'हा भारतीय तिंरगा असून, तुझा ड्रेस नाही' अशा खडतर शब्दांत प्रतिक्रिया दिली.

प्रियांका चोप्रा

आपल्याकडे नुकताच स्वांतत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये यादिवशी आपल्या देशाप्रती असलेला अभिमान पाहायला मिळतो. हाच अभिमान ते या दिवशी आपल्या कृतीतून दर्शविण्याचा प्रयत्न करतात. काहीजण देशाभिमान व्यक्त करण्यासाठी तिरंग्याचे टी-शर्ट घालतात. तर काही मुली तिरंग्याच्या रंगाचे ड्रेस घालून हा दिवस साजरा करतात. आपले बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील यात मागे नसतात. या दिवशी अनेकजणांनी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व भारतवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणजेच प्रियांका चोप्रा हिचाही यात समावेश होता.

वाचा : सेन्सॉरच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पहिल्याच दिवशी मारली दांडी

प्रियांकाने बूमरँग केलेला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. यात तिने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि निळसर अशी जीन्स घातली होती. त्यावर केशरी, पांढरा आणि हिरवा हे तिरंग्याचे रंग असलेला दुपट्टा गळ्याभोवती गुंडाळला होता. आपल्या देशाप्रती असलेल्या भावना तिने #Vibes #MyHeartBelongsToIndia #happyindependencedayindia #jaihind या हॅशटॅग्समधून व्यक्त केलेल्या. पण, प्रियांकाचा हा बूमरँग अनेकांना रुचला नाही. तिने व्हिडिओ शेअर करताच त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. प्रियांकाने भारतीय ध्वजाचा अपमान केला आहे असे काही नेटिझन्सने म्हटले. ‘तिंरग्याला वंदन करायला शिका मॅडम.. त्याच्यासोबत खेळू नका..’ अशीही प्रतिकिया एका युजरने दिली. इतकेच नव्हे तर एका युजरने तर तिला शिवीगाळ करत, ‘हा भारतीय तिंरगा असून, तुझा ड्रेस नाही’ अशा खडतर शब्दांत प्रतिक्रिया दिली.

वाचा : मानलेल्या मुलाने घेतली दिलीप कुमार यांची भेट

या सगळ्यामध्ये प्रियांकाच्या बाजूने बोलणाऱ्या युजर्सचाही समावेश होता. ‘बरं.. तुझ्या, माझ्यासह १२१ कोटी लोकांनी भारतीय ध्वज पाहिला आहे. मी जो तिरंगा पाहिला आहे त्यात अशोकचक्रही असते. तिने गुंडाळलेल्या दुपट्ट्यावर अशोकचक्र नसल्यामुळे तो राष्ट्रध्वज आहे असे म्हणता येणार नाही, इतकेच मला सांगायचे होते,’ असे एका युजरने लिहिले असून, एका मुलीने ‘हा आपल्या तिंरग्याच्या रंगांमध्ये असलेला केवळ दुपट्टा आहे. तो राष्ट्रध्वज नाही’ अशी प्रतिक्रिया दिली.

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या या अभिनेत्रीला आजवर अनेक कारणामुळे नेटिझन्सनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, प्रियांकाने आजवर प्रत्येकालाच सडेतोड उत्तर दिल्याचे आपण पाहिलेय. यावेळेस ती आपल्या टीकाकारांना कोणत्या शब्दांत उत्तर देणार ते नक्कीच पाहण्याजोगे असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 9:31 am

Web Title: priyanka chopra wear the national flag netizens called her un indian
Next Stories
1 भाडं थकवल्यामुळे लता रजनीकांत यांच्या शाळेला टाळं
2 ‘पहरेदार पिया की’ मध्ये चुकीचे दाखवलेले नाही’
3 सेन्सॉरच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पहिल्याच दिवशी मारली दांडी
Just Now!
X