News Flash

३२ लाखांची घड्याळ, १.७ लाखाचा ड्रेस प्रियांकाच्या ऑस्कर लूकने वेधल सगळ्यांच लक्ष

पाहा फोटो

लंडनमध्ये नुकताच ९३ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या नॉमिनेशनची घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने पती निक जोनससोबत या नॉमिनेशनची घोषणा केली. या नॉमिनेशन सोहळ्यादरम्यान प्रियांका आणि निकने चांगलीच धमाल केल्याचं पाहायला मिळालं दोघांनीदेखील या सोहळ्यातले खास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तर, ऑस्करच्या नॉमिनेशनसोबत प्रियांकाच्या कपड्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

या सोहळ्यासाठी प्रियांकाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर मॅचिंग असं निळ्या बेल्टचं घड्याळ तिने घातल्याचं दिसतंय. तर गुलाबी रंगाची बेली सॅण्डल तिने निवडल्या आहेत. प्रियांकाने परिधान केलेल्या त्या डिझायनर निळ्या ड्रेसची किंमत ही १.७ लाख रूपये आहे. सोबतच प्रियांकाच्या घड्याळची देखील चर्चा होताना दिसत आहे. प्रियांकाने Bvlgari Diva ची ड्रीम वाच घातली आहे. ई-कॉमर्स पोर्टल्सवर प्रियांकाच्या या घड्याळाची किंमत ही ३२ लाख ४७ हजारांच्या जवळपास आहे. अशा साध्या घड्याळाची किंमत एवढी कशी असा प्रश्न तुम्हाला आला असेल तर, ही घड्याळ १८ कॅरेट रोज गोल्ड केस आणि हिऱ्यांनी जडलेली आहे. ही लिस्ट इथेच संपलेली नाही, प्रियांकाने जी गुलाबी रंगाची बेली सॅण्डल परिधान केली आहे. तिची किंमत ही ५४ हजार आहे. कॅट पंपचा गुलाबी रंगाची ही Maison Christian Louboutin ची ही एक अप्रतिम सॅण्डल आहे. तर एकूण प्रियांकाच्या या लूकची किंमत ही ३४.८ लाख एवढी आहे. तर निक जोनसने गोल्डन सूट परिधान केल्याचं दिसतंय. या सूटच्या आत त्याने पांढऱ्या रंगाचं शर्ट घातलंय.
`

निकने या सोहळ्याती दोघांचा एक मजोशीर फोटो शेअर केलाय. यात दोघे एक भली मोठी ऑस्करची ट्रॉफी चोरून पळत असल्याचं दिसतंय. तर प्रियांकाच्या ‘द व्हाइट टायगर’ या सिनेमाला नॉमिनेशन मिळालं असून निकने प्रियांकाला आणि सिनेमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 7:49 pm

Web Title: priyanka chopra wears rs 32 lakh alligator strap watch for oscars 2021 nominations with nick jonas dcp 98
टॅग : Priyanka Chopra
Next Stories
1 अक्षय कुमार जाणार अयोध्येमध्ये; जाणून घ्या काय आहे कारण?
2 म्हणून माझ्या बायोपिकमध्ये आलिया भट्टने मुख्य भूमिका साकारावी, राखी सावंतने व्यक्त केली इच्छा
3 स्मृती इराणींची भावूक पोस्ट; लग्नाच्या वाढदिवसाच्या पतीला दिल्या शुभेच्छा
Just Now!
X