News Flash

अखेर दहा वर्षांनंतर सलमान प्रियांका येणार एकत्र!

प्रियांकाचा व्यग्र दिनक्रम पाहता हिंदी चित्रपटांसाठी तिला फारसा वेळ देता येत नाही. त्यामुळे २०१६ साली आलेल्या 'जय गंगाजल'नंतर प्रियांका हिंदी चित्रपटात दिसलीच नाही.

अखेर दहा वर्षांनंतर सलमान प्रियांका येणार एकत्र!
'भारत' या सिनेमात ती सलमानसोबत मुख्य अभिनेत्री असणार आहे.

प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे. ‘क्वांटिको’ मालिका आणि एका आगामी हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रिकरणात ती सध्या व्यग्र आहे. हॉलिवूडमध्ये तिच्या वाट्याला आलेल्या नवनव्या प्रोजक्ट्समुळे बॉलिवूडकडे प्रियांकानं काहीशी पाठ फिरवली आहे. ‘क्वांटिको’मुळे प्रियांकाला इच्छा असूनही बॉलिवूडमध्ये चित्रपट करता येत नाही. तिचा व्यग्र दिनक्रम पाहता हिंदी चित्रपटांसाठी तिला फारसा वेळ देता येत नाही. त्यामुळे २०१६ साली आलेल्या ‘जय गंगाजल’नंतर प्रियांका हिंदी चित्रपटात दिसलीच नाही. अखरे दोन वर्षांनंतर ती पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात दिसणार आहे.

वाचा : रात्री २ वाजताचा सलमानचा स्टंट पाहिलात का?

‘भारत’ या सिनेमात ती सलमानसोबत मुख्य अभिनेत्री असणार आहे. ‘सलमान आणि अली अब्बास जाफरसोबत काम करायला मी उत्सुक आहे. मला जे अपेक्षित होतं तशीच स्क्रिप्ट ‘भारत’ची आहे त्यामुळे मी लवकरच चाहत्यांना या चित्रपटातून दिसणार आहे’ अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे. तर ‘प्रियांका चोप्राही या चित्रपटासाठी योग्य आहे. फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील तिनं आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ‘भारत’साठी तिच्यापेक्षा उत्तम अभिनेत्री कोणी असूच शकत नाही असं अली अब्बास जाफर म्हणाले.

वाचा : पंतप्रधानांची भेट घेताना प्रियांकाने टाळली ‘ती’ चूक

अली अब्बास जाफर दिग्दर्शित ‘गुंडे’ चित्रपटात प्रियांका दिसली होती. तर सलमानसोबत तिनं ‘मुझसे शादी करोंगी’, ‘सलाम- ए- इश्क’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ या चित्रपटातून काम केलं आहे. सलमान आणि प्रियांका ही जोडी ‘भारत’निमित्त पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याआधी मुख्य अभिनेत्री म्हणून कतरिना कैफचंही नाव चर्चेत होतं. पण कतरिनाच्या नावाबद्दल अजूनही संभ्रम आहे. तर या चित्रपटात बॉबी देओलही दिसणार आहे. सलमान आणि बॉबी ‘रेस ३’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात बॉबीनं केलेल्या अभिनयानं प्रभावित होऊन सलमाननं ‘भारत’साठीही बॉबीला विचारलं. भारतमध्ये सलमान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2018 10:40 am

Web Title: priyanka chopra will be seen in salman khan starer bharat movie
Next Stories
1 आलियाच्या आवाजातील ‘राझी’मधील पहिलं गाणं ऐकलंत का?
2 नियतीने त्याला बनवलं ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन
3 Khichdi season 3 review: लोकांना आवडली का ही नवीन ‘खिचडी’
Just Now!
X