News Flash

प्रियांका चोप्राच्या ‘या’ हिल्सची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

समोरुन हे हील्स इतके तोकडे वाटत होते की, तिची काही बोटं हील्सच्या बाहेर आली होती

प्रियांका चोप्रा

गेल्या काही दिवसांपासून प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्केलच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र होत आहेत. या रॉयल वेडिंगमधले इंडियन कनेक्शनही आपण पाहिले. या लग्नाला देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही उपस्थिती लावली होती. रॉयल वेडिंगची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा प्रियांकाच्या उपस्थितीची आणि तिच्या कपड्यांची झाली. प्रियांकाने लग्नासाठी लव्हेंडर रंगाचा आउटफिट घातला होता. विवियन वेस्टवूडने हा ड्रेस डिझाइन केला होता. या ड्रेसला साजेशी अशी फिलिप ट्रेसीने डिझाइन केलेली हॅट घातली होती. प्रियांकाची ही हॅट तिला रॉयल लूक देत होती यात काही शंका नाही. या रॉयल वेडिंगमधील प्रियांकाने सुंदर ड्रेस घालूनही ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. तिच्या पूर्ण आऊटफिटमध्ये सर्वात आकर्षणाचा मुद्दा होता तो म्हणजे तिने घातलेले हील्स.

देसी गर्ल प्रियांकाच्या हील्सवर स्वारोस्की खड्यांनी स्टाइल केली गेली आहे. या खड्यांमुळे तिचे हील्स फार आकर्षक दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का की या हील्सची मुळ किंमत किती आहे ते? प्रियांकाच्या या हील्सची किंमत साधारणपणे १ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. सर्वसामान्य माणूस एवढ्या किंमतीचे हील्स घेण्याचा विचारही करु शकत नाही.

याआधी प्रियांकाला अनेक लोकांनी तिच्या हील्ससाठी ट्रोल केले होते. प्रियांकाचे हील्स फार अनकंफर्टेबल वाटत होती. समोरुन हे हील्स इतके तोकडे वाटत होते की, तिची काही बोटं हील्सच्या बाहेर आली होती. काही लोकांनी प्रियांकाला तिच्या कपड्यांसाठीही ट्रोल केले. काहींच्या मते, रॉयल वेडिंगला प्रियांकाने भारतीय पेहराव अर्थात साडीला प्राधान्य द्यायला हवे होते. पण बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी तिच्या ड्रेसचे भरभरून कौतुक केले. याआधीही प्रियांका पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटताना घातलेल्या ड्रेसमुळे ट्रोल झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 12:44 pm

Web Title: priyanka chopra wore massively expensive heels royal wedding
Next Stories
1 Rare Moment : जेव्हा साऊथचे त्रिमुर्ती एकत्र येतात..
2 ‘या’ पाच चेहऱ्यांना सलमानमुळे मिळाली ओळख
3 विराटबद्दल हे काय बोलून गेली करिना…? अनुष्का, ऐकतेयस ना गं?
Just Now!
X