प्रियांका चोप्राचा पहिला हॉलिवूड सिनेमा ‘बेवॉच’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रियांकाचे चाहते तिचा हा सिनेमा बघायला जेवढे उत्सुक आहेत तेवढेच ‘वंडर वुमन’ हा अजून एक हॉलिवूडपट बघायलाही चाहते उत्सुक आहेत. पण प्रियांकाच्या ‘बेवॉच’ला इस्राईलमधील अभिनेत्री गॅल गादोट स्टारर ‘वंडर वुमन’ या सिनेमाशी टक्कर द्यावी लागेल असेच दिसते. कारण हे दोन्ही सिनेमे भारतात एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. गॅल या सिनेमात रागिष्ट योद्ध्याची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. यात ती जेवढी रागीष्ट तेवढीच समजुतदार आणि प्रसंगी दयाळूही दिसते.

वॉर्नर ब्रदर्सचा हा सिनेमा येत्या २ जूनला भारतात प्रदर्शित केला जाणार आहे. याच तारखेला प्रियांका चोप्रा आणि ड्वेन जॉनसन यांचा ‘बेवॉच’ही भारतात प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे प्रियांकाच्या सिनेमाला टक्कर द्यायला ‘वंडर वुमन’च आली असं म्हणावं लागेल.

IPL Matches Boost BEST Revenue, 500 Buses Used, Bring Children to Wankhede Stadium, best buses in ipl, best bus ipl, best bus revenue ipl, indian premier league best bus,
आयपीएलमुळे बेस्टला ८० लाखांचे उत्पन्न
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

‘क्वांटिको’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका करणारी प्रियांका मोठ्या काळानंतर सिनेमात दिसणार आहे. पॅरामाउंट पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘बेवॉच’ हा सिनेमा, १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका टीव्ही मालिकेवर आधारित आहे. भारतातही ही मालिका फार प्रसिद्ध होती. परदेशात हा सिनेमा २५ मे रोजी प्रदर्शित होणार. परदेशात प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्याने हा सिनेमा भारतात २ जूनला प्रदर्शित होणार आहे.

‘वंडर वुमन’ सिनेमाचे दिग्दर्शन पॅटी जेनकिन्स यांनी केले आहे. डीसी कॉमिकच्या चरित्रावर आधारित हा सुपरहीरो प्रकारात मोडणारा सिनेमा आहे. ‘वंडर वुमन’ ही राजकन्या डायना म्हणून मोठी होत असते आणि ती एक योद्धाही असते. जेव्हा ती एका संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्या कोषातून बाहेर येते, तेव्हा तिला तिची खरी ताकद कळते.

‘वंडर वुमन’ सिनेमात गॅल गादोटसह क्रिस पाइन, रॉबिन राइट, डॅनी हटसन, डेविड थुलिस, कॉनी निलसन आणि एलिना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन’ या सिनेमात छोटीशी भूमिका साकारल्यानंतर गॅल आता ‘वंडर वुमन’ म्हणून प्रेक्षकांचे मन जिंकायला सज्ज झाली आहे.