प्रियांका चोप्राबद्दल एकही बातमी नाही असा दिवस जाणे अशक्य. बॉलिवूड- हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या प्रियांकाने नुकतेच ‘वोग इंडिया’ मासिकासाठी एक फोटोशूट केले होते. नुकतेच तिचे आणखी एक फोटोशूट व्हायरल झाले आहे. या फोटोशूटमधील प्रियांकाचा मेकअप पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल हे मात्र नक्की. ‘पेपर’ मासिकासाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये प्रियंकाने डोळ्यांच्या मेकअपवर आणि हेअर स्टाईलवर विशेष मेहनत घेतलेली दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रियांकाने अशा अनोख्या पद्धतीची हेअर स्टाइल करुन याआधी फोटोशूट केले असावे असे वाटत नाही. म्हणूनच भारतातील तिच्या चाहत्यांसाठी हे फोटो पाहणं फारचं कौतुकाचं वाटत आहे. गेल्यावर्षी याच मासिकासाठी दीपिका पदुकोणनेही फोटोशूट केले होते. ग्लोबल स्टार म्हणून प्रियांका नाव कमवत असताना ती एकाचवेळी हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. प्रियांका लवकरच अमेरिकेतील एक मालिकेची निर्मिती करणार आहे.

अभिनय आणि निर्मिती या कामांशिवाय ती गायनालाही तेवढेच महत्त्व देते. ‘यंग अॅण्ड फ्री’ हे गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्यात तिच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा नामांकीत डिजे विल स्पार्कही आहे. प्रियांकाने हे गाणे फक्त गायले नसून लिहिलेही आते.

गणेशोत्सवादरम्यान मुंबईला धावती भेट दिल्यानंतर प्रियांका टोरँटो चित्रपट महोत्सवासाठी गेली होती. या महोत्सवात तिच्या ‘पहुना’ या सिनेमाचे स्क्रिनिंग होते. प्रियांकाचा प्रॉडक्शन हाऊसमधील हा पाचवा सिनेमा आहे. या सिनेमात सिक्किममधील संस्कृतीचे दर्शन दाखवण्यात आले आहे. या सिनेमाआधी प्रियांकाने ‘काशी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सरवन’, ‘काय रे रास्कला’ अशा प्रादेशिक सिनेमांची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopras dramatic make over is an ode to her fashion days
First published on: 07-09-2017 at 22:45 IST