13 August 2020

News Flash

PIFF : प्रियांका चोप्राच्या ‘व्हेंटिलेटर’ला पुरस्कार!

या चित्रपटाची निवड न्यू यॉर्क चित्रपट महोत्सवासाठीही झालीय.

व्हेंटिलेटर

प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्स या निर्मिती संस्थेचा पहिला मराठी चित्रपट व्हेंटिलेटर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. डॉ.मधु चोप्रा निर्मित या चित्रपटाला यंदाच्या पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.

व्हेंटिलेटर सिनेमाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनीच या सिनेमाच्या पटकथेवरही काम केलं होतं. या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटात मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी काम केलं आहे. आशुतोष गोवारीकर आणि बमन इराणी यांच्याही सिनेमात मुख्य भुमिका आहेत. कौटुंबिक मूल्ये, प्रथा, परंपरा आणि नातेसंबंध यावर व्हेंटिलेटर सिनेमाने प्राकाशझोत टाकला होता. सिनेमा रसिकांनी भरभरून कौतुक केले होते. यावर्षी जानेवारीमध्ये चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर झाला होता. चित्रपटाच्या निर्मात्या मधू चोप्रा म्हणाल्या की, “व्हेंटिलेटर सिनेमाशी निगडीत प्रत्येकाचा हा सन्मान आहे. या सिनेमाचा विषय माझ्या हृदयाला भिडला. सिनेमाचा विषय प्रियंका, राजेश आणि आम्हा सगंळ्यानाच खूप भावला होता. या चित्रपटाची निवड न्यू यॉर्क चित्रपट महोत्सवासाठीही झालीय.”

राजेश मापुस्कर या पुरस्काराविषयी प्रतिक्रिय़ा देताना म्हणाले, “ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेल्या सर्वोत्कृष्ट पटकथेचा हा पुरस्कार माझा पहिला पुरस्कार आहे. मला अतिशय अभिमान वाटतो, की आमच्या पटकथेला हा पुरस्कार मिळाला. माझ्या लेखनाचं कौतुक झाल्याचा हा अभिमान आहे. व्हेंटिलेटर चित्रपटाची टिम आणि पर्पल पेबल पिक्चर्सचा हा सन्मान आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2017 1:28 pm

Web Title: priyanka chopras first marathi movie ventilator got piff award
Next Stories
1 Valentines Day 2017: दिव्यांकासाठी विवेकने आखला खास प्लॅन..
2 Valentines Day 2017 : मितालीची अनोखी व्हॅलेंटाइन डेट
3 Valentines Day 2017 : बॉलिवूडमध्ये काळानुरुप बदललेला रोमान्स
Just Now!
X