प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची जगभरात जोरदार चर्चा रंगली. भारतीयंमध्येही या लग्नाची जोरदार चर्चा करण्यात आली. हे लग्न ग्लोबल आयकॉनला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय बनवून गेले. प्रियांकानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर दुस-या स्थानी आहे. जोधपुरमध्ये पारंपरिक पध्दतीने लग्न करण्यापासून ते मुंबईमध्ये रिसेप्शनपर्यंत तीन आठवडे चाललेले प्रियंकाचे लग्न ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ प्रकारातील एक लग्न होते.

आंतरराष्ट्रीय मीडियानेही प्रियांका-निकच्या लग्नाचे फोटो, व्हिडीयोला चांगलीच प्रसिद्धि दिली. याआधी जागतिक पातळीवर बॉलिवूडमधील कोणत्याच लग्नाची इतक्या मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली नव्हती. प्रियांकाच्या मुंबईमध्ये झालेल्या रिसेप्शनचे फोटोही सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये ट्रेंड झाले. यामुळेच दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या कव्हरेजला मागे टाकत प्रियांका आणि निकचे लग्न सर्वाधिक चर्चेत राहीले. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे करण्यात आलेल्या अहवालातून हे समोर आले आहे. याबाबत बोलताना, स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्विन कौल सांगतात, “निक जोनास आणि प्रियांका चोप्रा दोघांचे लग्न दीपिका-रणवीरच्या लग्नापेक्षा डिजिटल न्यूज, फेसबुक, न्यूजप्रिंट, ट्विटर, इंस्टाग्राम आणि वायरल न्यूजव्दारे चांगलेच गाजले. ”

ते पुढे म्हणतात, “आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”