News Flash

प्रियांकाचं ‘अनफिनिश्ड’ आता हिंदीतही..???

पोस्टमधून दिले हिंदी आवृत्तीबद्दलचे संकेत

अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या ‘अनफिनिश्ड’ या आत्मचरित्रातून तिचा प्रावास वाचकांसमोर मांडला आहे. तिला तिच्या आयुष्यात आलेले चांगले, वाईट अनुभव, तिच्या खाजगी आयुष्याबद्दलचे काही खुलासे तिने या पुस्तकात केले आहेत. हे आत्मचरित्र अवघ्या काही दिवसांतच बेस्ट सेलर ठरलं. नवीन व्यक्तीला किंवा बाहेरच्या व्यक्तीला बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, या बद्दलही तिनं या पुस्तकात लिहिलं आहे.

आता प्रियांका आंतरराष्ट्रीय दर्जाची अभिनेत्री आहे. तिच्या करियरच्या सुरुवातीपासून तिचं निक जोनास बरोबरचं आयुष्य प्रत्येक गोष्टीबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे आणि त्यामुळे या पुस्तकाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आता तिने या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीबद्दल संकेत दिले आहेत.

तिने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती “अभि बाकी है सफर” हे हिंदी शब्द एका कागदावर लिहित आहे. या व्हिडिओला तिने “जल्द ही आ रहा है” असं कॅप्शनही दिलं आहे.  पण ह्या व्हिडिओ स्टोरीमध्ये तिने याहून अधिक काही लिहिलेलं नाही. पण या वाक्यावरून आणि हिंदीतल्या या लिखाणावरून एकच निष्कर्ष निघत आहे की प्रियांकाच्या ‘अनफिनिश्ड’ या आत्मचरित्राची हिंदी आवृत्ती येणार असावी. पण खरंच तसं आहे का यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल, असं दिसत आहे.

तिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती सध्या तिच्या पुस्तकाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर काही पॉडकास्ट्समध्येही ती सहभागी होत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘द व्हाईट टायगर’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. यात ती राजकुमार राव आणि आदर्श गौरव या कलाकारांसोबत दिसून आली. यातल्या तिच्या भूमिकेचं लोकांनी भरपूर कौतुकही केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 11:53 am

Web Title: priyanka posted a story indicates hindi version of unfinished vsk 98
टॅग : Priyanka Chopra
Next Stories
1 ‘स्लमडॉग मिलेनिअर’फेम अभिनेत्याने केला लैंगिक अत्याचाराच्या आरोपवर खुलासा
2 श्रेयाने शेअर केली गुड न्यूज, बेबी बंपसोबत फोटो केला शेअर
3 दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच आला करीना-सैफचा फोटो समोर
Just Now!
X