07 March 2021

News Flash

प्रियांकाचा ‘गुंडे’ पोहचला ओमानला

अली अब्बास जफरच्या 'गुंडे' चित्रपटात प्रियांका, रणवीर आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत.

| September 11, 2013 02:23 am

अली अब्बास जफरच्या ‘गुंडे’ चित्रपटात प्रियांका, रणवीर आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण आता ओमानमध्ये होणार आहे. यापूर्वी ‘गुंडे’च्या काही भागाचे चित्रिकरण कोलकत्यात करण्यात आले होते. आता ओमानमधील मस्कट शहरात उर्वरित भाग चित्रित करण्यात येईल, असे दिग्दर्शक अली जफरने ट्विट केले आहे. ‘गुंडे’ हा चित्रपट कोळसा माफियांवर आधारित असल्याने ओमान हे चित्रिकरणासाठी उत्तम राहिल असेही अलीने ट्विट केले असून त्याने ट्विटमध्ये ओमानमधील काही ठिकाणांची छायाचित्रे टाकली आहेत.

 

आदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या ‘गुंडे’मध्ये रणवीर आणि अर्जुन कपूर यात चोराच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९७१ आणि १९८८ सालातील काही सत्य घटनांवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. ‘गुंडे’ पुढील वर्षी १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 2:23 am

Web Title: priyanka ranveer arjuns gunday now in oman
Next Stories
1 पहाः सुपर रजनीकांतच्या ‘कोचादैय्या’चा ट्रेलर
2 पहाः ‘गोरी तेरे प्यार मे’ चित्रपटाचा ट्रेलर
3 सलमानचा बाप्पा बहिणीच्या घरी!
Just Now!
X