26 February 2021

News Flash

अखेर प्रियांकानेच उलगडलं त्या फोटोग्राफर्सचं गुपित

बेडरुमधला हा फोटो काढला कोणी असा प्रश्न विचारत प्रियांका निकला नेटकऱ्यांनी भंडावून सोडलं.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाला दोन महिने उलटले. आपल्या संसारात रमलेलं हे जोडपं सध्या सोशल मीडयावरचं लोकप्रिय जोडपं ठरलं आहे. नुकतंच प्रियांकानं आपल्या सोशल मीडियावर बेडरुमधला एक फोटो शेअर केला होता. निकच्या मिठीत विसावलेला तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. बेडरुमधला हा फोटो काढला कोणी असा प्रश्न विचारत प्रियांका निकला नेटकऱ्यांनी भंडावून सोडलं. अखेर या दोघांचे गुपचूप फोटो टिपणाऱ्या फोटोग्राफर्सचं गुपित प्रियांकानं उलगडलं.

हा फोटो प्रियांकाची चुलत बहिण दिव्यानं काढला असल्याचं गुपित तिनं अखेर उघड केलं. दिव्या प्रियांकाची स्टाइलिस्टही आहे. ती लॉस एंजलिसमध्ये राहते. प्रियांका आणि निक सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असतात. त्यांची फॅन फॉलोविंगही खूप मोठी आहे. त्यामुळे प्रियांका आणि निक दोघंही एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र यावेळी बेडरुमधल्या त्या फोटोमुळे दोघंही चर्चेत आले. हा फोटो टीपणारा छायाचित्रकार नेमका कोण हे जाणून घेण्याचं कुतूहल चाहत्यांना होतं अखेर प्रियांकाला त्यामागचं गुपित उघड करावं लागलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 2:00 pm

Web Title: priyanka reavealse mystery photographer behind the bedroom photo
Next Stories
1 रितेशने शोधला अजयचा कुत्रा….नेटीझन्सनी केली ‘टोटल धमाल’
2 ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’मध्ये होणार केतकी चितळेची एण्ट्री
3 असा झाला ‘How’s the Josh?’ या डायलॉगचा जन्म…
Just Now!
X