अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस आपल्या कामासोबतच आपल्या वक्तव्यांबद्दल तसंच हजरजबाबीपणाबद्दलही चर्चेत असते. आताही ती तिच्या एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे. एका पत्रकाराला तिने करारी उत्तर दिलेलं आहे.
प्रियांका आणि तिचा पती निक जोनस दोघांनी सोमवारी ऑस्कर पुरस्काराठीची नामांकनं घोषित केली. त्यासंदर्भात एका पत्रकाराने त्यांचं या क्षेत्रात काय योगदान आहे ज्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रियांकाने त्याला उत्तर दिलं आहे.
ऑस्ट्रेलियन पत्रकार पीटर फोर्डने हा प्रश्न उपस्थित केला आहे. पीटर हा ऑस्ट्रेलियामधला एक नामवंत पत्रकार आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे वक्तव्य केलं आहे. तो म्हणतो, या दोघांचा अनादर करायचा नाही पण मला कळत नाही की त्या दोघांचं चित्रपट क्षेत्रात काय योगदान आहे की ज्यामुळे त्यांना ऑस्कर पुरस्काराची नामांकनं जाहीर करण्याची संधी मिळाली आहे?
Would love your thoughts on what qualifies someone. Here are my 60+ film credentials for your adept consideration @mrpford https://t.co/8TY2sw1dKb pic.twitter.com/T8DnQbtXZG
— PRIYANKA (@priyankachopra) March 16, 2021
प्रियांकाने त्याला याच्यावर उत्तर दिलं आहे. तिने आपल्या चित्रपटांची यादीच शेअर केली आहे. त्यावर ती म्हणते, एखादी व्यक्ती पात्र आहे की नाही हे कशावरुन ठरवायचं याबद्दलचे तुमचे विचार आवडले. ही माझ्या ६० हून अधिक चित्रपटांची यादी आहे, ही तुम्ही विचारात घ्यावी. या उत्तरानंतर मात्र या पत्रकाराने आपलं अकाऊंट प्रायव्हेट केलं आहे.
प्रियाकांच्या या उत्तरावर तिचे चाहते भलतेच खूश झाले आहेत. बऱ्याच जणांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2021 7:07 pm