05 March 2021

News Flash

…म्हणून प्रियांका पडली १० वर्षं लहान निकच्या प्रेमात

जोडीदाराची निवड करताना प्रत्येक महिलेनं कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे हेदेखील प्रियांकानं सांगितलं.

प्रियांका- निक जोनास

प्रियांका चोप्रा हे नाव फक्त बॉलिवूडपुरताच मर्यादित राहिलं नसून ती आता ग्लोबल स्टारही झाली आहे. लवकरच ती अमेरिकन गायक निक जोनससोबत विवाहबंधनात अडकणार आहे. निक हा प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे, त्यामुळे दोघांमधलं वयाचं अंतर पाहता अनेकांच्या भुवाया उंचावल्या. प्रियांकानं वयापेक्षाही लहान व्यक्तीची निवड जोडीदार म्हणून का केली याचं कुतूहल अनेकांना होतं. अखेर प्रियांकानं पहिल्यांदाच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. न्यू-यॉर्कमध्ये प्रीवेडिंग पार्टी पार पडल्यानंतर प्रियांकानं एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. यावेळी तिनं निकच्या प्रेमात आपण का पडलो याचं उत्तर दिलं, तसेच जोडीदाराची निवड करताना प्रत्येक महिलेनं कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे हेही सांगितलं.

‘जो व्यक्ती तुमचा आदर करेल अशाच व्यक्तीची निवड आपण केली पाहिजे. याचा अर्थ त्यानं कॉफीचा आयता कप तुमच्या समोर ठेवला पाहिजे असा होत नाही. तुम्ही आयुष्यात एखाद्याच्या गोष्टींवर खूप मेहनत घेता त्या मेहनतीचा त्यानं आदर केला पाहिजे. ती व्यक्ती या सर्वगोष्टींचा आदर करत असेल तरच त्याची निवड करा. माझ्याबाबतीत म्हणायचं तर मी अशाच पद्धतीनं विचार करते’ असं ती म्हणाली. प्रियांका आणि निक हे दोघंही २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहे. डिसेंबरमध्ये ते दोघंही पारंपरिक भारतीय पद्धीतीनं विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 5:46 pm

Web Title: priyanka revealed what actually makes her relationship with nick jonas work
Next Stories
1 मेघानं ‘बिग बॉस’च्या खेळात डॉक्टरेट पदवी मिळवल्याचं दिसतंय – अनुप जलोटा
2 ‘या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे’, कुमार विश्वासकडून यशवंत देव यांना मराठीत श्रद्धांजली
3 ..म्हणून दीपिका- रणवीर इन्स्टाग्रामवर ठरले नंबर वन!
Just Now!
X