24 April 2019

News Flash

TOP 5 : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मंगळसूत्राचा चाहत्यांमध्ये ट्रेंड

दीपिकाने अंधेरीमधील एका दागिन्यांच्या दुकानातून हे खास मंगळसूत्र तयार करुन घेतलं होतं.

गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे सनईचौघडे वाजत आहे. अभिनेत्री सोनम कपूरपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींनी या वर्षभरामध्ये आपला जोडीदार निवडला. या साऱ्याच अभिनेत्रींच्या लग्नाची जोरदार चर्चाही चाहत्यांमध्ये झाली. अगदी त्यांच्या लग्नातील विधींपासून ते त्यांच्या मंगळसूत्रापर्यंत. लग्नात प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हावी यासाठी या अभिनेत्रींनी विशेष लक्ष दिलं असून त्यांनी मंगळसूत्राची निवडदेखील त्याच पद्धतीने केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांच्या मंगळसूत्राची चाहत्यांमध्ये खास चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे काही अभिनेत्रींनी स्वत:च मंगळसूत्राची डिझाइन तयार केली. याच डिझाइन्स पुढे चाहत्यांमध्ये एक आयकॉन म्हणून फेमस झाल्या.  त्यामुळे सध्या या मंगळसूत्रांचा चाहत्यांमध्ये ट्रेंड सुरु झाला आहे. चला तर मग पाहुयात या अभिनेत्रींच्या मंगळसूत्राविषयी काही खास माहिती.

१. प्रियांका चोप्रा- ‘देसी गर्ल’ ते ‘क्वांटिको गर्ल’ असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. जोधपूरमध्ये १ आणि २ डिसेंबर रोजी प्रियांकाने ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं. राजेशाही थाटात पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये प्रियांकाचं मंगळसूत्र हे आकर्षणाचा विषय ठरला. प्रियांकाने निवडलेल्या मंगळसूत्रात ‘वॉटर ड्रॅप शेप’चं पेण्डंट असून यामध्ये एक डायमंड बसविण्यात आला आहे. हे पेण्डंट सोन्याच्या चेनमध्ये गुंफण्यात आलं आहे. विशेष म्हणजे साधं वाटणारं हे मंगळसूत्र कोट्यावधी रुपयांचं असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

२. दीपिका पदुकोण – अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी लेक कोमा येथे डेस्टीनेशन वेडिंग केलं. या लग्नात दीपिकाने घातलेलं मंगळसूत्र तब्बल २० लाख रुपयांचं असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या अंधेरीमधील एका दागिन्यांच्या दुकानातून तिने हे मंगळसूत्र खरेदी केलं आहे.

 

३. ऐश्वर्या राय-बच्चन – बॉलिवूडचं ऐश्वर्य म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय. ऐश्वर्याने २० एप्रिल २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी लग्नगाठ बांधली. या लग्नात ऐश्वर्याने घातलेल्या मंगळसूत्राची किंमत तब्बल ४५ लाख रुपये होती. या मंगळसूत्रामध्ये हिरे जडविण्यात आले होते.

४. शिल्पा शेट्टी- फिटनेसकडे विशेष लक्ष देणाऱ्या शिल्पाने उद्योगपती राज कुंद्रा याच्यासोबत लग्नगाठ बांधली. २२ नोव्हेंबर २००२मध्ये लग्न केलेल्या शिल्पाने हटके मंगळसूत्राची निवड केली होती. हे मंगळसूत्र गळ्यात न घालता ते ब्रेसलेट स्वरुपात होतं. त्यामुळे शिल्पाने मंगळसूत्र गळ्यात न घालता हातात बांधलं होतं. या मंगळसूत्राची किंमत ३० लाख रुपये होती.

५. सोनम कपूर – फॅशनिस्टा’ म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणारी सोनम कपूरने प्रियकर आनंद आहुजासोबत लग्न केलं आहे. विशेष म्हणजे सोनमने स्वत: तिचं मंगळसूत्र डिझाइन केलं असून यात आनंद आणि तिच्या राशीच्या चिन्हाचा समावेश आहे.

First Published on December 6, 2018 11:51 am

Web Title: priyanka to deepika expensive mangalsutra of bollywood actress