19 September 2020

News Flash

सासऱ्याची कंपनी कर्जबाजारी, तरी प्रियांका – निकचं लग्न धुमधडाक्यातच

पॉल यांची कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानं लग्न साधेपणानं होईल अशी चर्चा सुरू झाली आहे.

प्रियांका चोप्रा- निक जोनास

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या होणाऱ्या सासऱ्यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. पॉल जोनास यांच्या एका रियल इस्टेट कंपनी वर एक मिलियन डॉलरचं कर्ज आहे. २ लाख ६८हजार डॉलर्सचा खटलाही त्यांच्या कंपनीवर होता. हा खटला पॉल जोनास यांची कंपनी हरली होती. त्यामुळे पॉल जोनास पैशांसाठी आता आपली न्यूजर्सी कन्स्ट्रक्शन आणि रियल इस्टेट कंपनीची संपत्ती विकण्याच्या तयारीत आहेत असंही समजत आहे.

हवाईमध्ये हे दोघंही लग्न करणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. मात्र पॉल यांची कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानं लग्न साधेपणानं होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र प्रियांकाच्या नातेवाईकांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. ‘प्रियांका आणि निकनं भविष्यासाठी आधीच योजना आखून ठेवली आहे आणि यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. प्रियांका आणि निकच्या लग्नाला अवधी आहे. पॉल जोनास यांची आर्थिक परिस्थिती सध्या खालावलेली असली तरी याचा कोणताही परिणाम लग्नाच्या तयारीवर होणार नाही. वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी निक आणि त्याचा भाऊ असे दोघंही समर्थ आहे.’ असं प्रियांकाच्या नातेवाईकांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

त्यामुळे प्रियांका आणि निकचं लग्न धुमधडाक्यातच होणार असं म्हटलं जात आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रियांका आणि निक विवाहबंधनात अडकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 11:19 am

Web Title: priyanka wedding plans are unchanged nick father bankruptcy
Next Stories
1 शाहरूखमुळेच कतरिनानं मला होकार दिला – सलमान खान
2 आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना राखीचं सडेतोड उत्तर
3 बाप झाल्यानंतर एका तासांत शाहिदचे अकाऊंट हॅक; कतरिनावर आक्षेपार्ह ट्विट
Just Now!
X