News Flash

ऋषी कपूर- इरफान खाननंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का, प्रोड्यूसर्स गिल्डच्या CEOचे निधन

करण जोहरने ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे

बुधवारी बॉलिवूड अभिनेता इरफान खान आणि त्यापाठोपाठ गुरुवारी बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. आता प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ़ इंडियाचे CEO कुलमीत मक्कड यांचे निधन झाले आहे. चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री विद्या बालनने याबाबत माहिती देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कुलमीत मक्कड यांचे मुंबईमध्ये हार्ट अटॅकने निधन झाले आहे. करण जोहरने ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कुलमीत तुम्ही प्रोड्यूसर गिल्डचे एक महत्त्वाचे व्यक्ती होतात. तुम्ही इंडस्ट्रीसाठी खूप काही केले आहे अशा अशयाचे ट्विट करत करणने कुलमीत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेत्री विद्या बालनने देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कुलमीत मक्कड़ यांनी २०१० मध्ये प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ़ इंडियामध्ये सीईओ म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यापूर्वी ते ‘सा रे गा मा’ आणि ‘रिलांयन्स एंटरटेनमेंट’सारख्या कंपन्यांमध्ये काम करत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 3:27 pm

Web Title: producers guild of india ceo kulmeet makkar died avb 95
Next Stories
1 “करोनामुळे गमावले कुटुंबातील दोन सदस्य”; अभिनेत्याने केला खुलासा
2 “उद्धव ठाकरेंचे ते शब्द ऐकून समाधान वाटले”, लतादीदींनी व्यक्त केल्या भावना
3 इरफान खानच्या निधनावर पत्नीची काळजाला भिडणारी पोस्ट