24 February 2021

News Flash

‘डान्सिंग अंकल’ आता विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर

विदिशा महापालिकेने दिली संधी

गोविंदा आणि मिथुन स्टाईल डान्स करुन सोशल मीडियावर सगळ्यांची मने जिंकणारे डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव आता विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर म्हणून निवडले गेले आहेत. २९ आणि ३० मे पासून डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव यांचा गोविंदा स्टाईल डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हे डान्सिंग अंकल म्हणजे मध्य प्रदेशातील एका महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक आहेत. त्यांचे नाव संजीव श्रीवास्तव आहे हे शुक्रवारीच समजले आहे. गोविंदा आणि मिथुन हे माझे आयडॉल आहेत त्यांचा नाच पाहूनच मी नाच शिकलो असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. आता याच डान्सिंग अंकलना विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर होण्याची संधी मिळाली आहे.

माझा व्हिडिओ व्हायरल होईल आणि लोकांना तो इतका आवडेल असे वाटलेच नव्हते. मी १९८२ पासून नाच करतो. गोविंदा हे माझे आयडॉल आहेत असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. तसेच माझा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचे आणि तो आवडणाऱ्यांचे मी आभार मानतो असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. आता हेच श्रीवास्तव अंकल विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 10:37 pm

Web Title: professor sanjeev srivastava whose dancing video went viral on social media has been appointed as the brand ambassador by vidisha municipal corporation
Next Stories
1 माझी भूमिका मी नागपुरातच स्पष्ट करणार-प्रणव मुखर्जी
2 ३० वर्षांपूर्वी मृत घोषित केलेला रशियन वैमानिक अफगाणिस्तानात सापडला जिवंत
3 शेतकऱ्यांचे आंदोलन हा तर पब्लिसिटी स्टंट, केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून जखमेवर मीठ
Just Now!
X