26 February 2021

News Flash

#Surgicalstrike2 : अक्षय म्हणतो, अंदर घुस के मारो

'मला तुमचा अभिमान वाटतो, आता शांत बसून चालणार नाही.'

अक्षय कुमार

भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ला केला. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं शहीदांचा बदला घेतला. या कारवाईमुळे देशभरातून भारतीय वायूदलाचं कौतुक होत आहे. अभिनेता अक्षय कुमारनंही वायूदलाचं कौतुक केलं आहे.

#Surgicalstrike2 : दिवसाची सुरूवात छान झाली, बॉलिवूडनं केलं भारतीय वायूदलाचं कौतुक

‘दहशतवाद्यांच्या तळांचा नाश केल्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो, आता शांत बसून चालणार नाही. घर मे घुस के मारो’ असं ट्विट करत अक्षयनं वायूदलाचं कौतुक केलं आहे. पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अक्षयनं तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता. या हल्ल्यानंतर अक्षयनं अल्पावधीतच शहीदांच्या कुटुंबीयांसाठी मदतनीधी जमवला होता. सात कोटींची मदत त्यांनी शहीदांच्या कुटुंबीयांसाठी गोळा केली होती. यात ५ कोटींची रक्कम स्वत: अक्षयनं दिली होती.

भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. ही बातमी समजताच अक्षयनं ट्विट करत वायूदलाचं कौतुक केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 12:05 pm

Web Title: proud of our indianairforce fighters surgical strike 2 akshay kumar
Next Stories
1 #Surgicalstrike2 : दिवसाची सुरूवात छान झाली, बॉलिवूडनं केलं भारतीय वायूदलाचं कौतुक
2 अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये शाहरूखऐवजी विकीची वर्णी ?
3 भन्साळींसाठी एकत्र येणार प्रियांका- सलमान?
Just Now!
X