News Flash

Pulwama Attack: ‘चार दिवस सगळे रडतील नंतर शहीदांना विसरतील’

राखीने पंतप्रधान मोदींना मदत करण्याचं आवाहन केलं आहे

राखी सावंत

आयटम गर्ल राखी सावंत तिच्या आजवरच्या कारकीर्दीमध्ये बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. राखीने केलेल्या प्रत्येक विधानानंतर तिला अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. मात्र तरीदेखील राखी बिंधास्तपणे सोशल मीडियावर तिचं मत मांडत असते. पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

राखीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. त्यासोबतच या कुटुंबियांच्या खात्यात ५० लाख रुपये जमा करावेत असंही तिने सांगितलं आहे.

‘पंतप्रधान मोदीजी, आज तुम्ही किंवा आम्ही सुखाने जी झोप घेतोय ती केवळ सिमेवर लढणाऱ्या जवानांमुळे. ते आहेत म्हणून आपण आहोत. आपल्यासाठी ते जीवाची बाजी लावतात. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी काही तरी केलं पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे, की शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करावी. ही मदत मी तुम्हाला स्वखर्चातून करायला सांगत नाहीये. तर सरकारी खजिन्यात जी रक्कम आहे, त्यातूनच करायला सांगत आहे. कारण ही संपत्ती लोकांनी भरलेल्या करातूनच जमा झालेली आहे. त्यामुळे या कुटुंबियांना मदत करा’, असं राखी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

पुढे ती असंही म्हणते, ‘आज साऱ्या देशभरामध्ये शोक व्यक्त केला जात आहे. मात्र हे केवळ चार दिवसांपुरत आहे. चार दिवसांनंतर सारे जण जवानांच्या बलिदानाला विसरतील आणि आपआपल्या मार्गाला लागती. मात्र या शहीदांच्या कुटुंबियांचं काय ? नंतर या कुटुंबियांची परवड होऊ नये यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे’.

दरम्यान, कायम वादग्रस्त विधान करणाऱ्या राखीने जवानांच्या कुटुंबियांविषयी केलं वक्तव्य ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी अनेकांना मदतीचे हात पुढे केले आहेत. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची संख्या अधिक असल्याचंही पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 1:41 pm

Web Title: pulwama attack rakhi sawant urges pm narendra modi to help families of the martyred jawans
Next Stories
1 ‘ही’ अभिनेत्री साकारणार पंतप्रधान मोदींच्या आईची भूमिका
2 Video : ‘गली बॉय’च्या अभिनयाची छाप विल स्मिथवर
3 शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ‘टोटल धमाल’च्या टीमनं जमवला ५० लाखांचा निधी
Just Now!
X