News Flash

‘टोटल धमाल’ पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही- अजय देवगन

चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय अजयनं ट्विटरवर जाहीर केला आहे

'टोटल धमाल' २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ‘टोटल धमाल’ चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय अजय देवगन आणि इतर कलाकरांनी घेतला आहे.

१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा आत्मघातकी हल्ल्यानंतर ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. अभिनेता अजय देवगननंही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला होता. हा हल्ला अत्यंत भ्याड होता. माझा राग मी शब्दात व्यक्त करू शकत नाही असं म्हणत अजयनं ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. सध्याची परिस्थीती पाहता ‘टोटल धमाल’ हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं घेतला असल्याचं अजयनं ट्विटरवर जाहीर केलं आहे.

भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात प्रेक्षकांची चांगली पसंती लाभते. अनेकदा पाकिस्तानी चित्रपटांपेक्षाही भारतीय चित्रपट चांगला नफा कमावत असंही समोर आलं आहे. मात्र अजयनं हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. रितेश देशमुख, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अर्शद वारसी, जावेद जाफ्री यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

तर दुसरीकडे या चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ५० लाखांची मदतही गोळा केली आहे. या चित्रपटाच्या टीममधल्या कलाकरांपासून ते प्रत्येक छोट्या मोठ्या व्यक्तीनं हा निधी गोळा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 2:23 pm

Web Title: pulwama attack team of total dhamaal has decided to not release the film in pakistan
Next Stories
1 ‘गली बॉय’ची बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाईची
2 Pulwama Attack : टी- सीरिजनं युट्यूबवरून हटवली पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान- आतिफ अस्लमची गाणी
3 Pulwama Attack: ‘चार दिवस सगळे रडतील नंतर शहीदांना विसरतील’
Just Now!
X