News Flash

भारताला प्रत्युत्तर देण्याची भाषा करणाऱ्या इम्रान खान यांचं गायक अली जफरकडून कौतुक

अलीला भारतीयांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

भारतानं युद्ध छेडल्यास पाकिस्तान ही प्रत्युत्तर देईल अशी भाषा करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं गायक अली जफरकडून कौतुक करण्यात आलं आहे. पुलवामा हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. या हल्ल्यात ४० हून अधिक सीआरपीएफचे जवान शहीद झाले तर अनेक जवान गंभीर जखीमदेखील झाले आहेत.

या हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. कोणताही पुरावा नसताना पाकिस्तानवर आरोप करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या चौकशीला आम्ही तयार असून जे पुरावे आहेत ते भारताने आम्हाला द्यावेत आम्ही कारवाई करू असं आश्वासन इम्रान खान यांनी केलं. मात्र आपल्या भाषणाच्या शेवटी जर भारताला युद्ध हवं असल्यास आम्हीदेखील प्रत्युतर देऊ असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला आहे.

या भाषणाचं पाकिस्तानी गायक अली जफार यानं कौतुक केलं आहे. अलीनं ट्विट करत खूप चांगलं भाषण दिलं असं म्हणत इम्रान खान यांचं कौतुक केलं. मात्र त्याच्या ट्विटनं अलीचे भारतीय चाहते दुखावले आहेत. अली गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांसाठी अलीनं गाणी गायली आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड चित्रपटांतही त्यानं काम केलं आहे. अशा वेळी असंवेदना दाखवणं योग्य नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी अलीला ट्रोल केलं आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर काम करण्यापासून बंदीही घालण्यात आली आहे. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ आणि ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’ या दोन महत्त्वाच्या संघटना आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या २८ संघटनांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर टी- सीरिजनं आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान यांची गाणी हटवली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘टोटल धमाल’, ‘लुका छुपी’ यांसारखे चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 7:50 pm

Web Title: pulwama atttack ali zafar says what a speech to pakistan prime minister imran khan
Next Stories
1 Trailer Launch : जाणून घ्या काय आहे ‘मेड इन हेवन’ वेबसीरिज
2 ‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून तो एक विश्वास आहे’
3 VIDEO : लगीन घाईची धम्माल गोष्ट सांगणाऱ्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा टीझर पाहिलात का?
Just Now!
X