28 October 2020

News Flash

कायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा – पालिका

बंगल्यातील बेकायदा बांधकामाचे कंगनानेही आपल्या याचिकेतही खंडन केलेले नाही.

(संग्रहित छायाचित्र)

बंगल्यातील बेकायदा बांधकामावरील कारवाईविरोधात अभिनेत्री कंगना राणावतने केलेली याचिका ही कायद्याचा दुरूपयोग करण्याचा प्रकार असून तिची याचिका फेटाळण्यासह तिला त्यासाठी दंड आकारण्याची मागणी पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे शुक्रवारी उच्च न्यायालयात केली.

कंगनाने सुधारित याचिका करत पालिकेची कारवाई बेकायदा ठरवण्याची, तसेच पालिकेला नुकसान भरपाई म्हणून दोन कोटी रुपये देण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्यावर पालिकेने अ‍ॅड. जोएल कार्लोस यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात पालिकेने कंगनाने केलेली याचिकाही कायद्याचा दुरुपयोग असल्याचा दावा करत तिलाच त्यासाठी दंड आकरण्याची मागणी केली.

पालिकेने या प्रतिज्ञापत्रात कंगनाने केलेल्या सगळ्या आरोपांचे खंडन केले आहे. बंगल्यातील बेकायदा बांधकामाचे कंगनानेही आपल्या याचिकेतही खंडन केलेले नाही. पालिकेने यापूर्वी दिलेल्या परवानगीचाच दाखला देत कंगना परवानगी दिल्याचा खोटा आरोप करत असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2020 12:27 am

Web Title: punish kangana for abusing the law bmc abn 97
Next Stories
1 सुशांतसिंह प्रकरणातील आरोपींच्या जामिनाबाबत घाईत निर्णय नको -न्यायालय
2 मूल्याधिष्ठित समाज नाहीसा होतोय!
3 सुशांतसाठी न्याय मागणारे आता गप्प का? फराह खानचा SSR Warriorsला सवाल
Just Now!
X