News Flash

‘दंगल’साठी दलेर मेहंदीने गायले उत्साहवर्धक गाणे

हे गाणे ऐकण्यासाठी अनेकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाची दर दिवसाआड नवी चर्चा आहे. या चित्रपटातील आमिरचा लूक सध्या अनेकांचे लक्ष वेधत आहे. या चित्रपटाबाबत सिनेवर्तुळातही उत्सुकतेचे वातावरण आहे. नुकतेच आमिरच्या ‘दंगल’ या चित्रपटाचे शीर्षकगीत सुप्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी गायले आहे. सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार हे गाणे फारच अर्थपूर्ण असून ते सर्वांनाच एक सकारात्मक उर्जा देणारं गाणं ठरेल असं मत दलेर मेहंदी यांनी मांडलं आहे. या गाण्याला प्रीतमनं संगीतबद्ध केले आहे. त्यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असंही दलेर मेहंदी म्हणाले. त्यामुळे हे गाणे ऐकण्यासाठी अनेकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
‘दंगल’ या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट दोन मुलींच्या वडिलांच्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये टिव्हीवरील गाजलेली अभिनेत्री साक्षी तन्वर आमिरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. ‘दंगल’साठी आमिर दोन वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या भूमिकेसाठी आमिरला वजन वाढवावेही लागले आणि दुसऱ्या भागात ते त्याच वेगाने कमीही करावं लागलं आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट येत्या नाताळमध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे.
एकीकडे ‘दंगल’ ची चर्चा संपते ना संपते, तोच आमिर त्याच्या दुसऱ्या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त झाला आहे. प्रत्येक सिनेमात काही तरी नवीन करण्यासाठी आमिर खान नेहमीच मेहनत घेताना दिसतो. ‘दंगल’ सिनेमासाठी त्याने आपल्या शरिरयष्ठीवर घेतलेली मेहनत तर सगळ्यांनीच पाहिली. काही दिवसांपूर्वी त्याचा असाच एक लूक व्हायरल झाला होता. त्याचा हा लूक ‘सिक्रेट सुपरस्टार’ या आगामी सिनेमासाठी त्याने केला होता.
या लूकमध्ये हा परफेक्शनिस्ट अभिनेता पिळदार मिशा, बाल्बो स्टाईल दाढी लूकमध्ये दिसतो. पण यात विशेष लक्ष वेधले ते त्याच्या डोक्यावरील मोठमोठ्या क्लिप्सने. ‘मॅड मॅक्स’ या हॉलीवूड सिरीजमध्ये शक्यतो हे पाहावयास मिळते. त्यामुळे विविध रुपांमध्ये दिसणारा आमिर तुर्तास त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाने सिनेरसिकांना भुरळ घालण्यात कितपत यशस्वी ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 5:46 pm

Web Title: punjabi singer daler mehandi sang the title song of dangal
Next Stories
1 ‘द रिंग’च्या सेटवर किंग खान आणि अब्रमामची धमाल
2 सलमान राहतं घर सोडणार?
3 ..आलियासोबत काम करण्यास या अभिनेत्याचा स्पष्ट नकार
Just Now!
X