ऐतिहासिक मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळ्या असतात. पडद्यावरचे दृश्य खरेखुरे वाटावे यासाठी अत्यंत नेमकेपणाने दृक सौंदर्य साकारावे लागते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील आगामी भव्य ऐतिहासिक मालिका पुण्यश्लोक अहिल्याबाई नववर्षाची प्रेरणादायक सुरुवात करत ४ जानेवारीपासून पडद्यावर येण्यास सज्ज आहे. या मालिकेत इतिहासातील एक महत्त्वाचे प्रकरण जिवंत करण्यात आले आहे, ज्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा मांडली आहे. या मालिकेसाठी योग्य दृक् सौंदर्य साकारण्यासठी निर्मात्यांनी तब्बल सहा महिने व्यापक संशोधन केले आणि पुढील सहा महीने अगदी सुरुवातीपासून सेट तयार करण्यात खर्ची केले.

सेट उभारण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलताना कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर म्हणाले, “हा सेट तयार करताना १५-१८व्या शतकातील मराठी-माळवा संस्कृती आमची प्रेरणा होती. मी यापूर्वी काही पौराणिक मालिकांसाठी काम केलेले आहे. पण ही माझी पहिलीच ऐतिहासिक मालिका आहे आणि मी म्हणेन की, हा अगदीच वेगळा अनुभव आहे. पौराणिक मालिकांमध्ये कलात्मक स्वातंत्र्य घेता येते, पण इथे मात्र जास्तीत जास्त अचूक आणि नेमके असण्यावर आमचा भर असतो. कारण त्याची सहज तुलना केली जाते. सेट डिझाइन अस्सल दिसण्यासाठी आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पार्श्वभूमीसाठी पडदे आणि महालातील इतर फर्निचरसाठी अस्सल आणि उच्च दर्जाचे माहेश्वरी वस्त्र वापरले आहे.”

Yashasvi Jaiswal is the first player to score two centuries in IPL before turning 23
IPL 2024: यशस्वीने एकाच शतकासह रचला इतिहास, आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…

या मालिकेतील सेट डिझाइनबद्दल पुढे बोलताना दिग्दर्शक जॅक्सन सेठी म्हणाले, “कथानकाच्या मांडणीत सेटची भूमिका मोठी असते. जर दृश्ये अचूक किंवा चपखल नसतील, तर त्यामुळे संपूर्ण कथा विस्कळीत होऊ शकते. यामुळेच, पुण्यश्लोक अहिल्याबाई साठी सेट उभारताना तो अगदी अस्सल आणि राजेशाही असावा याबाबत आमचा कटाक्ष होता. या मालिकेसाठी साजेसा सेट उभारायला आम्हाला बराच जास्त वेळ लागला. आम्ही प्रेक्षकांना थेट त्या काळात घेऊन जाऊ इच्छितो, जेथे ते अहिल्याबाई होळकरांचा जीवनप्रवास आणि त्यांचे वैभव अनुभवू शकतील.”

पुण्यश्लोक अहिल्याबाई ही मालिका ४ जानेवारीपासून दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेसात वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होईल.